औसा-लातूर राष्ट्रीय महामार्गाजवळील फुलमळा तलावात केले आंदोलन
औसा (Jalsamadhi Andolan) : तालुक्यातील महिला शेतकऱ्यांनी घेतली जलसमाधी सोयाबीनला ८५०० हमीभावा द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी औसा – लातूर राष्ट्रीय महामार्गाजवळील फुलमळा तलावात उतरून हातात सोयाबीनला ८ हजार ५०० रुपयांचा हमी भाव मिळावा म्हणून फलक घेऊन (Jalsamadhi Andolan) आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव मिळावा म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपये हमीभाव द्यावा आणि गतवर्षीचा खरिपाचा पीकविमा द्यावा, या मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या विजयकुमार घाडगे यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. महिला व पुरुष शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२८) दुपारी १.३० वाजता जलसमाधी आंदोलन सुरू केले. हे (Jalsamadhi Andolan) आंदोलन सुमारे अर्धा तास चालू होते. या आंदोलनाबाबत औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला गेला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विजयकुमार घाडगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. आज (Jalsamadhi Andolan) उपोषणास ११ दिवस झालेत, हे उपोषण उठावे म्हणून सर्व लोक देवाला प्रार्थना, आरत्या घालून साकडे घालत आहेत. विविध संघटना, पक्ष बाजूला ठेऊन मी शेतकरी या नात्याने वेगवेगळे आंदोलन, मोर्च धरणे, ट्रॅक्टर रॅली काढून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शेतकरी नेते राजेंद्र मोरे व राजीव कसबे यांनी यावेळी बोलताना केला.
या (Jalsamadhi Andolan) जलसंमाधी आंदोलनात शीतल तमलवार, सुमनताई कांबळे, गंगादेवी, लिंबराज लोखंडे, हणमंत सुरवसे, पाखरे, प्रज्योत हुडे, अप्पाराव हुडे, आत्माराम पाटील, शरद रामशेटे, रामेश्वर पाटवदकर महाराज, संपत गायकवाड, अप्पाराव हुडे, भुराबाई राठोड, अमोल कांबळे, रमेश तेलंग, दत्ताभाऊ किणीकर, रावसाहेब केसरकर, दगडू बरडे, सावन गवळी, मुस्तफा देशमुख, सुरेश सूर्यवंशी जीवन कसबे, भीमसेन क्षीरसागर, अविनाश गायकवाड, राहुल गायकवाड, तानाजी कांबळे, लिंबराज लोखंडे, राजकुमार सस्तापुरे, शाम जाधव वाघोलीकर, अरुण दादा कुलकर्णी, सत्तार पटेल, नवनाथ शिंदे, विवेक पाटील, भरत पाटील, सुनंदा पाटील, नरसिंग पाटील, संयोजक राजेंद्र मोरे, राजीव कसबे सहभागी होते.