अखनूर/जम्मू (Jammu Bus accident) : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला (Jammu Bus accident) अपघात झाला. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, यात्रेकरूंनी भरलेली बस रस्त्यावरून घसरली आणि खड्ड्यात पडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. बस हरियाणाच्या कुरुक्षेत्र भागातून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरी भागात यात्रेकरूंना घेऊन जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चोकी चोरा पट्ट्यातील टांगली वळणावर हा भीषण अपघात झाला. (Bus accident) बस सुमारे 150 फूट खाली खड्ड्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी स्थानिक लोकांसह बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल (Jammu Hospital) आणि सरकारी मेडिकल कॉलेज (जीएमसी) हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, आज जम्मू जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी (Bus accident) बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.
जम्मूच्या नायब राज्यपालांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एलजीच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मूमधील अखनूरमधील (Bus accident) बस दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आहे.
Akhnoor bus accident | J&K | The bus accident in Akhnoor, Jammu is heart-rending. I condole the loss of lives and pray to the almighty to give the bereaved families the strength to bear the irreparable loss. Praying for the speedy recovery of the injured.
(Source: Office of LG,…
— ANI (@ANI) May 30, 2024