बांदीपोरा ग्राऊंड झिरो येथे भीषण अपघात
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील वुलर व्ह्यूपॉईंटजवळ (Wular Viewpoint) शनिवारी लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरले आणि खोल खड्ड्यात पडले. या अपघातात दोन जवान शहीद (Soldier Martyr) झाले तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर जखमी जवानांना बांदीपोरा जिल्हा रुग्णालयात (District Hospital) आणण्यात आले. माहितीनुसार, बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वाणी म्हणाले, ‘येथे 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू (2 Soldiers Killed) झाला होता, 3 जखमींची प्रकृती चिंताजनक होती, त्यांना उपचारासाठी श्रीनगरला (Srinagar) पाठवण्यात आले होते. पुढे इक्बाल म्हणाले की, तीन गंभीर जखमी जवानांना शुद्धीवर आणण्यात आले आणि त्यानंतर त्यांना श्रीनगरला रेफर करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) रस्त्यावरून घसरल्याने पाच सैनिक ठार झाले आणि चालकासह पाच जण गंभीर जखमी झाल्याच्या एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.
अपघातावेळी वाहन रस्त्यावरून पूंछजवळील नाल्यात पडले
ज्या वाहनाने अपघात झाला, तो सहा वाहनांच्या ताफ्याचा भाग होता. अपघातावेळी वाहन रस्त्यावरून पूंछजवळील नाल्यात पडले. प्राथमिक तपासात सध्या ही दहशतवादी घटना मानली जात नाही. कारण गेल्या एक महिन्यापासून काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) थंडीची लाट कायम असून, शनिवारी सकाळीही काश्मीरच्या काही भागात धुक्याचा दाट थर होता. हवामान खात्याच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोऱ्याच्या मध्यभागी आणि वरच्या भागात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय हवामान खात्याने शनिवारी ‘यलो’ अलर्ट आणि रविवारी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून त्यात जोरदार हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.
#JammuAndKashmir: Two soldiers lost their lives, and three others sustained injuries when an Army vehicle skidded off the road and fell into a gorge near Wular Viewpoint in Bandipora district.#IndianArmy #Accident #Bandipora pic.twitter.com/Ipcg6zgBZn
— Military Cognizance (@MiliCognizance) January 4, 2025
रविवारीही शून्य दृश्यमानता अपेक्षित आहे
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: रविवारी रस्ते आणि हवाई सेवा विस्कळीत होऊ शकतात. IMD च्या अंदाजानुसार, लोकांना पुढील 24 तासांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगण्यात आले आहे.