जम्मू (Jammu Kashmir Terrorist Attack) : गेल्या काही दशकांपासून शांतता राखल्यानंतर जम्मूचा परिसर गेल्या काही वर्षांत अचानक अशांत दिसू लागला आहे. अवघ्या 8 दिवसांत जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात दहशतवादी हल्ले (terrorist attack) आणि दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 8 लष्करी जवान आणि एक अधिकारी शहीद झाला आहे. एक महिना मागे गेल्यास, 9 जूनपासून झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 9 सुरक्षा दलांचे तसेच 10 नागरिकांनी प्राण गमावले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) जम्मू परिसरात (Jammu kashmir) ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ल्याच्या 5 घटना घडल्या आहेत, ते आश्चर्यकारक आहे. पवित्र अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) सुरू असताना आणि येथे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना हे प्रमाण जास्त वाढले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर हल्ल्यांत मोठी वाढ का?
4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) निकाल जाहीर झाले आणि 9 जून रोजीच (terrorist attack) दहशतवाद्यांनी जम्मूच्या रियासी येथे एका बसला लक्ष्य केले, ज्यामुळे ती खड्ड्यात पडली आणि 9 यात्रेकरू ठार आणि 42 जखमी झाले. सरकारच्या माहितीनुसार, 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर, या केंद्रशासित प्रदेशात विशेषत: (Jammu kashmir) काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दगडफेकीच्या घटना जवळपास इतिहासजमा झाल्या आहेत. ज्या प्रकारची ‘अराजकता’ तिथे असायची, जिथे अनावश्यक संपामुळे सामान्य जनजीवन ठप्प झाले होते, ते नक्कीच कमी झाले आहे.
जम्मूमधील या भागांत जास्त दहशतवादी हल्ला?
जम्मूच्या भागात काही ठिकाणी उंच पर्वत आणि इतर ठिकाणी सपाट प्रदेश आहेत. हा विभागही घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. हा वैविध्यपूर्ण प्रदेश अनेकदा दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी सुरक्षा दलांसाठी विशेष आव्हाने उभी करतो. 8 जुलै रोजी कठुआ येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर शोध मोहिमेत आलेली आव्हाने ही त्याचीच उदाहरणे आहेत.
जम्मूमध्ये दहशतवाद का वाढू लागला?
माहितीनुसार, काश्मीर खोरे (Jammu kashmir) हा मुस्लिम लोकवस्तीचा भाग आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात आपल्या (terrorist attack) दहशतवाद्यांना पाय रोवता यावा, यासाठी दहशतवादी जम्मू भागात ‘असुरक्षिततेचे वातावरण’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे जम्मू भागात जातीय तणावही वाढू शकतो. अहवालानुसार, पाकिस्तानातून 20 ते 25 कट्टर दहशतवादी घुसण्याची शक्यता आहे. त्यांचे दोन गट आहेत, त्यापैकी एक जम्मूच्या पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे आणि दुसरा गट पूर्वेकडील कठुआ-डोडा-बसंतगड भागात सक्रिय आहे.