अखिल भारतीय तांडा सुधार समितीचा पुढाकार
पुसद (Tanda Improvement Samiti) : तालुक्यातील जमशेटपूर येथील ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तांडा सुधार समितीचे उपाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी ग्रामपंचायतीला सातत्याने निवेदने व विनंती करून सुद्धा अतिक्रमण न काढल्यामुळे ग्रामपंचायतीला सुचना पत्र देऊन दि. 5 जुलै पासून जमशेटपूर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंदन रामजी चव्हाण रा. जमशेटपूर 24 जून रोजी आमरण उपोषणास बसणार होतो. मात्र ग्रामपंचायत कार्यालयाने आठ दिवसात रस्त्यावरील अतिक्रमण काढतो असे आश्वासन दिल्यामुळे मी उपोषण स्थगित केले होते. मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नसल्यामुळे मी आमरण उपोषणास बसलो आहे. या आशयाचे निवेदन दिले. त्याच्या प्रति आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, युवा नेते ययाती नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यांच्या समवेत आमरण उपोषणाला रमेश दगडू आडे, भीमराव नरसिंग राठोड, जयसिंग राठोड, मांगीलाल राठोड हे बसले आहेत. #- चौकट घेणे -” सदरील व्यक्तींची दि. 4 जुलै रोजी भेट घेऊन त्यांची समजूत काढली की, सदरील प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, आपणास न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मदत लागत असेल तर चांगला वकील आपण लावून देऊ – गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस. “