मानोरा (Washim):- शहरात मानोरा – मंगरूळपीर रोडवर असलेली जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी बंद असल्याने खातेदार ग्राहक आपल्या विड्रॉल करीता गेले असता खाली हात परतण्याची पाळी आली.
विड्रॉल करीता गेले असता खाली हात परतण्याची पाळी
जन संघर्ष अर्बन लिमिटेड निधी शाखा मानोऱ्यात दिग्रस येथील प्रणित मोरे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच स्थापन केली होती. या निधी शाखेने ठेवीवर १२ टक्के व्याज देऊ म्हणत खातेदाराकडून लाख, दोन लाख करत कोटी रुपये जमा केले आहेत. या छोट्याश्या शाखेने अल्पावधीत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या होत्या तर दिग्रस येथील मुख्य शाखेच्या ग्राहकांनी दिग्रस पोलीस स्टेशन (police station)मध्ये तक्रारी केल्या त्याची चर्चा मानोरा मधील ग्राहकाना लागताच ठेवीदार आपले पैसे काढण्यासाठी बॅकेमध्ये गेले असता त्यांना बॅक बंद असल्याने मानोऱ्या मध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ग्राहकांना ठेवीबाबत अपेक्षित उत्तर शाखा कर्मचाऱ्यांकडून मिळत नसल्याने संशय व गोंधळाला सुरूवात झाली. सुरुवातीला ग्राहकाला विड्राल मिळाला, परंतु मंगळवारी शाखा कुलुप बंद दिसल्याने ग्राहक संतापले आहेत.