पुसद(Pusad Crime) :- जनसंघर्ष अर्बन निधी लि. दिग्रस या बँकेची स्थापना अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे यांनी १.११.२०२१ रोजी केली. सदर अर्बन निधीची शाखा पुसद येथे उपडण्यात आली आणि या ठिकाणी व्यवस्थापक म्हणुन ओजस अनिल वाळले वय ३५ हे कार्यरत आहेत.
व्यवस्थापक ओजस वाळले यांची शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
पुसद शाखेमध्ये १३ कोटींच्या वर ठेवी घेण्यात आल्या. ठेवीवर १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. काही ठेवीदारांनी उचल मागितली असता बँकेचे अध्यक्ष देवानंद मोरे यांनी रक्कम पाठविली नाही. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक (Fraud) झाल्याचे निदर्शनास येताच व्यवस्थापक ओजस वाळले यांनी अनेक ठेवीदारांसमक्ष शहर पोलिस स्टेशनमध्ये (Police station) फिर्याद दिली आहे. ज्यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत असे लोकांचे खरेदी विक्री रद्द करून संबंधितांचा शोध घ्यावा अशी फिर्याद त्यांनी दिली आहे. हे वृत्त लिहेपर्यंत शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.
जनसंघर्ष अर्बन निधी लि. दिग्रस यांच्या वतीने ७ शाखा सुरु
प्राप्त माहितीनुसार, जनसंघर्ष अर्बन निधी लि. दिग्रस यांच्या वतीने ७ शाखा सुरु आहेत. या अर्बन निधीचे संचालक पुढील प्रमाणे देवानंद लक्ष्मण मोरे अध्यक्ष, अनिल रामनारायण जयस्वाल उपाध्यक्ष, खा. संजय उत्तमराव देशमुख, विवेक बनगिनवार, डॉ. अर्पणा अभय पाटील, डॉ. संजीवनी अनिल कोळसे, अजय मदनलालजी बाजोरिया, रविंद्र गणपत अरगडे, सुदर्शन मारोतराव हासवे, गजानन बापुराव मोरे, बाबासाहेब मारोतराव पाटील, हशिल जयेश शहा, सुमित प्रदीपकुमार सिंगवी, सुभाष बलदेव पवार, पलक यतीमकुमार गड़ा हे संचालक मंडळ आहे. दि. १.११.२०२१ पासून बँकेचे(Bank) काम सुरळीत चालु आहे. पुसद शाखेमध्ये एकूण ठेवीदारांची अनामत रक्कम १३ कोटी ६४ लाख ४२ हजार ५३५ एवढी आहे.
१२ कोटी ६० लाख ६ हजार २३७ एवढी रक्कम शाखेमार्फत कर्ज चाटप करणे बाकी
त्यापैकी १२ कोटी ६० लाख ६ हजार २३७ एवढी रक्कम शाखेमार्फत कर्ज चाटप करणे बाकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरळीत व नियमितपणे केला जात होता. दोन महिन्यांपासून अध्यक्ष देवानंद मोरे हे मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देत असल्यामुळे याचाबत त्यांच्याशी बोलणी करीता स्वतः व्यवस्थापक व शाखेतील सर्व पिग्मी एजंट नागेश लोथे लिपीक, अजिंक्य धोंगडे लिपीक हे सर्वजण दि. ६ डिसेंबर रोजी अध्यक्षांना भेटण्याकरीता लिंगा रोड दिग्रस येथे वास्तव्यास असलेल्या फॉर्महाऊसवर गेले. तेथे त्यांचा मुलगा व शाखेचा संचालक प्रणित मोरे यांची भेट झाली. त्यांनी १ डिसेंबरला पुसद शाखेत येणार असल्याचे सांगितले. रोख रक्कम घेवून येणार आणि ठेवीदारांना बोलावुन घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे व्यवस्थापक यांनी ठेवीदारांना दि. ९ रोजी उपस्थित राहण्यास सांगितले. ते न आल्यामुळे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना फोनद्वारे संपर्क केला असता दोघांचे भ्रमणध्वनी बंद होते. भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे व्यवस्थापक यांनी आपत्त्या सहकारी व पिम्मी एजंट यांना घेऊन दिग्रस येथे त्यांच्या घरी गेले असता घराला कुलूप आढळुन आले.
चौकशी केले असता दोन दिवसांपासून ते घरी नसल्याचे कळाले
शाखेत गेले असता तेथेही कोणीही आढळले नाही. व्यवस्थापक वाळले यांचा अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पुसद शाखेतील आर्थिक व्यवहार कोलमडला. त्यातच जनसंघर्ष बँकेच्या इतर शाखेमध्ये ठेवीदार व बचत खात्यातील ग्राहक, पिग्मी धारक व आवर्ती ठेव धारक यांच्यात आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे रक्कम काढण्यासाठी ग्राहक व ठेवीदार यांनी पुसद शाखेत एकच गर्दी केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. १३ कोटी ठेवी घेणाऱ्या या शाखेमध्ये सर्व खाते मिळून केवळ ५२ हजार रुपये रक्कम शिल्लक आहे. शाखेचा एकूण व्यवहार बॅलेन्सशिटप्रमाणे १४,७६,१४,४१९ (चौदा कोटी शहात्तर लाख चौदा हजार चारशे एकोणवीस रुपये) इतका असुन एकूण उपलब्ध रक्कम ७१, २४१ रुपये शाखेकडे आहे. उर्वरित १४ कोटी ७५ लाख ४३ हजार १७२ रुपये हे ग्राहकांना परत करणे अनिवार्य आहे.
सर्व ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले
आज रोजी १४ कोटी ७५ लाख ४३ हजार १७२ रुपये यापैकी कर्जामधुन प्राप्त होणारी रक्कम वगळता उर्वरित सर्व रकमेचा आर्थिक गैरव्यवहार होऊन पुसद शाखे अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांसह सर्व ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या शाखेत कर्मचारी संख्या ११ व सर्व ग्राहकांची संख्या ६२० व पिग्मी एजंट १६ असा सर्व कुटुंबाची फसवणूक झाली आहे. अध्यक्ष देवानंद मोरे, कार्यकारी संचालक प्रणित मोरे यांच्यासह प्रीतम मोरे व साहील
जयसवाल हे या फसवणुकीस कारणीभूत असुन ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. याचा शोध घेवून सर्व ठेवीदार ग्राहकांची रक्कम परत करणे गरजेचे आहे. या सर्व व्यक्तींचा शोध घेत असतांना दिरंगाई होऊ नये म्हणुन या सर्व व्यक्तींचे आर्थिक व्यवहाराचे खाते, जंगम व स्थावर मालमत्तेचे व्यवहार हे त्वरीत थांबविण्यात यावे अथवा या पुर्वी ज्यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत अशी खरेदी विक्री रह करणे बाबत कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता व्यवस्थापक ओजस वाळले यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सखोल चौकशी केल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी सांगितले.