मतदार संघात नेत्यांनी तमाशा चालविला
मानोरा (Karanja-Manora Assembly Election) : कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भाजपामधून आणत आयात उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता काय करावे, यासाठी काँग्रेसने जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या नेतृत्वात दि. २७ ऑक्टोंबर रोजी कारंजा येथे घेण्यात आला.
या जनता दरबाराला काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भोजराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्या नेत्या ज्योतीताई गणेशपुरे, काँग्रेसचे वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर, तालुकाध्यक्ष दिलीप देशमुख, आम आदमी पार्टीचे ऍड मनिष मोडक, गजानन राठोड, संजय भानावत, अमीर खान पठाण, हाफिज खान, नंदाताई तायडे, चेतना पवार आदीसह इतरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा देवानंद पवार यांचा निर्धार
यावेळी देवानंद पवार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जनतेच्या अदालत न्यायालयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अपील घेऊन आलो आहे. राजकीय पुढाऱ्यांनी महाविकास व महायुतीची उमेदवारी पक्षा बाहेरील उमेदवारी देत राजकीय षडयंत्र रचून कार्यकर्ते व मतदार राजावर तिकीट वाटपात अन्याय केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील निष्ठावंत इच्छूक उमेदवारावर अन्याय झाला आहे. आम्हाला जनतेच्या हक्कासाठी लढायचा गुन्हा आहे का ? ज्या लोकांनी कालपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे वाटप करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते, त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. आता आपण जनताच ठरवा जनतेच्या आवडीचा की नेत्यांच्या निवडीचा उमेदवार कसा हवा, यासाठी ही जनता की अदालत कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे जनतेनेच आता (Karanja-Manora Assembly Election) निवडणूक लढविण्यासाठी ठरवून निर्णय देण्याची विनंती केली.
शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तसेच जनतेचे अस्तित्व व स्वाभिमानाच्या लढाईसाठी निवडणूक लढायची असेल तर जनता की दरबार मधून सर्वांचा आशीर्वाद सोबत पाहिजे, असे म्हणून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला. व जनतेच्या न्याय दरबारात पास झाल्याने आज सोमवारी देवानंद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.