जय विदर्भ पार्टीची निवडणूक संदर्भात बैठक
नागपूर (Jay Vidarbha Party) : आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका जय विदर्भ पार्टी (Jay Vidarbha Party) पूर्ण ताकतीने लढणार असून निवडणुकीसंदर्भात पार्टीची दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राची बैठक दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई यांच्या आयोजनात महालक्ष्मीनगर येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार होते. बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण नागपूर विधानसभेमध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठीसमोर सादर करण्यात आली. त्यासोबतच दक्षिण नागपुरातील समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
दक्षिण नागपूर मतदार संघाबाबत झाली चर्चा
पार्टीच्या विस्ताराबाबत महासचिव विष्णुपंत आष्टीकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कार्यकर्त्यांना सांगितले की, आपली पार्टी (Jay Vidarbha Party) ही आंदोलनातून निर्माण झाली आहे. त्यात आपण एक कलमी मागणी करीत आहो ती म्हणजे ‘स्वतंत्र विदर्भ राज्य.’ आपल्याशिवाय कोणीही विदर्भाच्या जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. विदर्भाची जनता आपल्याकडे आतुरतेने पाहत आहे. आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचे फळ येणार्या विधानसभा निवडणुकीत मिळणार व ‘अबकी बार विदर्भ की सरकार’ हा नारा साकार होणारच म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने कामात लागावे, असे आवाहनही केदार यांनी याप्रसंगी केले.
बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश मासूरकर, सहसचिव गुलाबराव धांडे,महिला प्रांताध्यक्ष सुधा पावडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौलतकर, शहर अध्यक्ष अॅड. मृणाल मोरे, नरेश निमजे, सतीश शेंदरे, किशोर कुर्वे, हरिराम नासरे, रामकृष्ण खोपकर, संगीता अंबारे, शोभा येवले, सविता रंगारी, लता अवजेकर, हररभाऊ पाणबुडे, महेश बेरोडिया, हररदास धकाते, प्रशांत तागडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.