प्रचार रॅलीला सुंदरखेड परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद…
बुलढाणा (Jayshree Shelke) : फुले, शिव, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांनी नाळ कायम जपली आहे. जयश्रीताईंना संविधानाविषयी प्रचंड आस्था असून राजकारण हे त्यांचे ध्येय कधीच राहिले नाही, असे समाजभुषण दिलीपभाऊ जाधव (Dilip Jadhav) यांनी सांगून जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल शेळके (Jayshree Shelke) यांची प्रचार रॅली आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी शहरातील सुंदरखेड परिसरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. नालंदा बुध्दविहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते सुनील सपकाळ हे होते. पुढे बोलताना दिलीपभाऊ यांनी राजकीय व्यक्ती आपले राजकारण डोळ्यापुढे ठेवून कार्य करतात. मात्र, जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांनी असा विचार कधीच केला नाही. त्यांनी वेगवेगळे प्रयोग जिल्ह्यात विविध ठिकाणी केले. संग्रामपूर तालुक्यात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला. सिंदखेडराजा येथे चित्रपट नगरी सुरू केली.
दरवर्षी येथे कृषी मेळावा घेऊन शेतकर्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यामाध्यमातून दिली. बुलढाणा येथे महिला बचतगट प्रदर्शनी त्यांनी घेतली. त्यांनी राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारणाचा विचार त्यांनी सातत्याने केला आहे. संविधानिक मूल्य मानणार्या व्यक्ती ह्या लोकशाहीसाठी आवश्यक आहेत, अन्यथा हुकूमशाही यायला वेळ लागत नाही. आजूबाजूला पाहिल्यास लोकशाही मूल्य जपली जातात का? हे आपल्याला दिसेल. हुकूमशाही टाळायची असेल तर संविधानिक जपणार्या विचारांना बळ द्यावे लागेल, असे दिलीपभाऊ जाधव म्हणाले. तसेच त्यांनी जयश्रीताई शेळके (Jayshree Shelke) यांना निवडून आणणे ही संविधान मानणार्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून त्यांना निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.