राजकारणासाठी सैनिकाच्या मुलीने निवडली लढाऊ सेनाच..
बुलढाणा (Jayshree Shelke) : नागरिक व मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ठेवतात ते म्हणजे सीमेवर तैनात असलेले जवान. जेथे देशप्रेमाचे धडे मिळतात, त्या सैनिकाच्या घरी जयश्रीताई शेळके यांचा जन्म झाल्याने त्यांना देशप्रेमाचे धडे मिळाले. वडील सैन्यात असल्याने बालपण राज्याबाहेर वेगवेगळ्या तळांवर गेल्याने त्याग, समर्पण तसेच संघर्ष करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी आली.सैन्यातील जीवन त्यांना वडिल सेवानिवृत्त होईपर्यंत पाहता आल्याने आज जयश्रीताई (Jayshree Shelke) राजकारणात आल्या असून या सैनिक कन्येने राजकारणासाठी निवडली ती देखील लढाऊ शिवसेनाच.
बालपणी भिनलेला लढवया सैनिकांचा बाणा त्यांच्यात आजही कायम आहे. म्हणूनच त्यांनी राजकारणातील लढाऊ शिवसेनेला पसंती देत राजकीय एन्ट्री घेतलीय. सैनिक कन्येपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राजकीय शिवसैनिक नेतृत्वापर्यंत आला असून सैनिक वर्गासाठी त्या ‘लेकीच्या’ ठाई आहे. हजारो आजी-माजी सैनिकांचे देशप्रेमी, राकट हात आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके (Jayshree Shelke) यांना सर्व समाज घटकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सर्वसामान्य गोरगरीब नागरिक,सर्व जाती धर्माचे मतदार, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, कामगार, शेतकरी, मजूर, लहान मोठे व्यापारी या सर्व घटकांचे त्यांच्या उमेदवारीला समर्थन आहे. उच्च शिक्षित, शांत, संयमी, विनम्र स्वभावामुळे सर्व स्तरातील मतदारांचे त्यांना पाठबळ मिळत आहे.वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा संगम असलेल्या आघाडीच्या कार्यक्षम उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके (Jayshree Shelke) यांच्याबद्दल हजारोंच्या संख्येत असलेल्या मतदार संघातील शूरवीर आजी माजी सैनिक, त्यांचे परिवार आणि सैनिकी घरातील युवक युवतींना, माता भगिनींना जयश्रीताई यांच्याबद्दल मनापासून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आपलेपण असण्याचे कारण त्यांचे सैनिक कन्या असणे हे आहे. त्यांचे वडील विजय उत्तमराव डुकरे हे लष्करी जवान होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात दीर्घ सेवा दिली. देशसेवा करून १९९८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
रक्तातच देशभक्ती भिनलेली
सैनिकाची कन्या असलेल्या (Jayshree Shelke) जयश्री ताईंचा जन्म प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र देशभक्त सैनिकाची कन्या असल्याने त्यांच्या रक्तातच देशभक्ती, कडक शिस्त, वेळेचे महत्व, काटकपणा भिनलेला आहे. एका साध्या सैनिकाच्या घरात जन्म घेतल्याने त्यांना गरिबीची, अडचणींची, शेतकरी जीवन गावगाड्याची जाण आहे. त्यांनी स्वराज्य जनक राजमाता जिजाऊ, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई पुâले, छत्रपती शिवराय यांना आदर्श मानून जयश्रीताईंनी आपले शिक्षण पूर्ण करीत त्या उच्चशिक्षित झाल्या.
जयश्रीताई शिवसेनेच्या धाडसी सैनिक..
हजारो आजी-माजी सैनिकांना, त्यांच्या परिवार, त्यांचे मूलबाळांबद्दल जयश्रीताई शेळके यांना आपुलकी, जिव्हाळा आहे. लढवय्या शिवसेनेची धाडसी सैनिक असलेल्या (Jayshree Shelke) जयश्रीताई बुलढाण्याच्या रणसंग्रामात उतरल्या आहेत. भारतीय सैनिक जीवाची बाजी लावतो पण पराभूत होत नाही, त्याच जिद्द, निर्धाराने ताई मैदानात उतरल्या आहेत. लाखो मतदार प्रमाणेच हजारो भारतीय जवानांचे, त्यांच्या परिवाराचे पाठबळ, त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने एका सैनिकाची ही कन्या, रणरागिणी लढाई जिंकणारच हे निश्चित!