JDU पक्षाने त्यांना पदावरून काढून टाकले
मणिपूर (JDU Manipur) : नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्ष जनता दल युनायटेड (JDU) ने मणिपूर प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. त्यांनी मणिपूरच्या राज्यपालांना पत्र लिहून मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. वीरेंद्र सिंह (Virender Singh) यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यामागे (JDU Manipur) जेडीयूने अनुशासनहीनतेचा उल्लेख केला आहे. “जनता दल युनायटेडने मणिपूर राज्य पक्षाध्यक्ष वीरेंद्र सिंग यांना, ज्यांनी पत्र लिहिले होते. त्यांना अनुशासनहीनतेच्या आरोपावरून त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे,” असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.
#WATCH | Delhi: JD(U) national spokesperson Rajeev Ranjan Prasad says, "This is misleading and baseless. The party has taken cognisance of this and the president of Manipur unit of the party has been relieved of his position. We have supported NDA and our support to the NDA… https://t.co/PhAJwAp4xn pic.twitter.com/usvowgta3n
— ANI (@ANI) January 22, 2025
भाजपला पाठिंबा सुरू ठेवण्याची घोषणा
JDUने स्पष्ट केले की, ते मणिपूरमधील भाजप सरकारला पाठिंबा देत राहील. JDUने आपली भूमिका स्पष्ट केली आणि म्हटले की, “जनता दल युनायटेड मणिपूर तसेच बिहार आणि केंद्रात भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
JDU चे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, “हे दिशाभूल करणारे आणि निराधार आहे. पक्षाने त्याची दखल घेतली आहे आणि पक्षाच्या मणिपूर युनिट अध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा दिला आहे आणि एनडीए सरकारला आमचा पाठिंबा आहे.” मणिपूरमध्ये भविष्यातही असेच सुरू राहील. (JDU Manipur) मणिपूर युनिटने केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधला नाही, त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यांनी (JDU Manipur) स्वतः पत्र लिहिले. ते अनुशासनहीनता मानून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत आणि राज्य युनिट मणिपूरच्या लोकांची सेवा करत राहील आणि राज्याच्या विकासात योगदान देत राहील.
JD(U) withdraws its support to BJP Government in Manipur.
"In the election to State Assembly of Manipur held in 2022, six candidates set up by JD(U) were returned. After a few months, five MLAs of JD(U) defected to BJP…After JD(U) became a part of INDIA bloc, support to the… pic.twitter.com/f9uAtQ5SUY
— ANI (@ANI) January 22, 2025
इंडिया युतीचा संदर्भ
JDUच्या इंडिया ब्लॉकसोबतच्या युतीचा संदर्भ देत पत्रात पाठिंबा काढून घेतल्याची पुष्टी करण्यात आली. “मणिपूरचे एकमेव JDU आमदार मोहम्मद अब्दुल नासिर हे विधानसभेच्या अलिकडच्या अधिवेशनात विरोधकांसोबत बसले होते,” असे पत्रात म्हटले आहे. जेडीयूच्या (JDU Manipur) या निर्णयानंतर, पक्ष मणिपूरमधील भाजप सरकारला पाठिंबा देत राहील हे स्पष्ट झाले आहे. वीरेंद्र सिंह (Virender Singh) यांना काढून टाकून पक्षाने असा संदेश दिला आहे की, अनुशासनहीनतेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.