JEE Advanced 2025 : JEE Advanced 2025 ची तारीख घोषित करण्यात आली आहे. 18 मे रोजी दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर 2 दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत होणार आहे.
IIT कानपूरने JEE Advanced 2025 ची तारीख जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, JEE Advanced परीक्षा रविवार, 18 मे 2025 रोजी होणार आहे. परीक्षेत दोन पेपर (पेपर 1 आणि पेपर 2) असतील, ज्याचा कालावधी तीन तासांचा असेल. दोन्ही पेपरमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. JEE ॲडव्हान्स पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर 2 दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत होईल.
संयुक्त प्रवेश मंडळाने (JAB) काही काळापूर्वी JEE ॲडव्हान्ससाठी प्रयत्नांची संख्या दोनवरून तीनपर्यंत वाढवली होती. तथापि, घोषणेच्या काही आठवड्यांनंतर, JAB ने आपला निर्णय मागे घेतला आणि मागील वर्षांमध्ये वापरलेले पात्रता निकष पुन्हा स्थापित केले, ज्यामुळे JEE Advanced साठी प्रयत्नांची संख्या दोन पर्यंत मर्यादित होती.
अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, संयुक्त प्रवेश मंडळाने (JAB) 5 नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली होती. ज्यात JEE ॲडव्हान्स्डसाठी प्रयत्नांची संख्या दोन वरून तीन पर्यंत वाढवण्याबद्दल माहिती दिली होती. मात्र त्यानंतर, 15 नोव्हेंबरच्या संयुक्त प्रवेश मंडळाच्या बैठकीत विचार केल्यानंतर त्यात बदल करण्यात आला. बैठकीनंतर, JEE ॲडव्हान्स्डमध्ये बसण्याच्या दोनच संधी असतील, असे ठरले. इतर सर्व पात्रता निकष समान राहतील.
JEE Advanced साठी वयोमर्यादा
JEE Advanced 2025 मध्ये बसण्यासाठी उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. SC, ST आणि PwD उमेदवारांना वयात पाच वर्षांची सूट दिली जाते. याचा अर्थ त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1995 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
JEE मेनमध्ये २,५०,००० च्या आत रँक आवश्यक
JEE Advanced मध्ये बसण्यासाठी, JEE Main मध्ये उमेदवारांची रँक टॉप 2,50,000 च्या आत असावी. यामध्ये GEN-EWS ला 10%, OBC-NCL ला 27%, SC ला 15%, ST ला 7.5% आरक्षण मिळेल. उर्वरित 40.5% जागा सर्वांसाठी खुल्या असतील. PwD उमेदवारांसाठी या पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी 5% क्षैतिज आरक्षण (Horizontal reservation) उपलब्ध आहे.