परभणी(Parbhani) :- बसमध्ये चढत असताना महिला प्रवाशाजवळील ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold ornaments)आणि एक मोबाईल (Mobile)लंपास करण्यात आला. ही घटना परभणी बसस्थानकात(Bus stand) घडली. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सुनीता बरकुले या महिलेने तक्रार दिली आहे. सदर महिला आई- वडिलांसोबत गंगाखेड येथे पाहुण्याला भेटायला जायचे असल्याने परभणी बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढताना त्यांच्याजवळील दागिने, मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार कोतवाली पोलीसात देण्यात आली आहे.
परभणी बस स्थानकात दर आठवड्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे घटना वाढत आहे शासनाच्या वतीने लावण्यात आलेले कॅमेरा (Camera)नावालाच असून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बसस्थानकात पोलीस चौकी वरील कर्मचारी किती प्रवाशाकडे लक्ष देणार यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.