परभणी(Parbhani):- दैनिक देशोन्नती मनस्विनी महिलांच्या वतीने ’झाडे लावा, झाडे जगवा’, ही खुली स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी महिलांना पाच झाडे मोफत देण्यात येत आहेत. या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खास महिलांच्या आग्रहास्तव स्पर्धेला आता २६ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे या खुल्या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे.
महिलांच्या आग्रहास्तव स्पर्धेला २६ ऑगस्टपर्यत मुदतवाढ
परभणी जिल्ह्यातील सर्व महिलांकरिता (women) ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. नोंदणी केल्यानंतर महिलांना एक कुपन देण्यात येईल. कुपन दाखवून पाथरी रोडवरील सरदेशपांडे अॅग्रो नर्सरीमध्ये(Agro Nursery) स्पर्धकांना मोफत झाडे मिळतील. २६ ऑगस्ट पर्यंत झाडांची (Trees) लागवड करुन झाडांचा फोटो ९८५०२०९१७८ या व्हॉटस् अॅपवर मोबाईल क्रमांकावर दर तीन महिन्यानंतर पाठवावा लागणार आहे. वर्षभर स्पर्धकांना झाडांचे संवर्धन करावे लागणार आहे. ५ जून २०२५ रोजी स्पर्धेचा निकाल जाहिर होईल. महिलांनी स्पर्धेत सहभाग नोदवावा, असे आवाहन मनिषा गोरे यांनी केले आहे.