कारंजा (Jihadi Terrorism) : जम्मू कश्मिरमध्ये ९ जून रोजी ईस्लामिक जिहादी पाकीस्तान पोशित (Jihadi Terrorism) आतंकवाद्यांनी धार्मिक यात्रेकरिता निघालेल्या भक्तांच्या बसवर अंधाधूंद गोळीबार करुन १० जणांची हत्या केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ १२ जून रोजी स्थानिक झांशी राणी चौक, बायपास येथे (Bajrang Dal) बजरंग दलच्यावतीने जिहादी आतंकवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
हिंदू भक्तांवर भ्याड हल्ला करणार्यांचा (Bajrang Dal) बजरंग दलने निषेध केला व मृत्यूमुखी पडलेल्या भक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच असे भ्याड कृत्य करणार्या व्यक्ती, संघटना देशाअंतर्गत व देशाबाहेरील आतंकवाद्यांना सहकार्य करणार्या व्यक्ती अथवा (Jihadi Terrorism) जिहादी संघटना यांच्यावर देशव्यापी कार्यवाही करण्याकरीता आपल्या स्तरावरुन केंद्र शासनाला सूचित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली असून, त्यासंबंधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी बजरंग दलचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल, नगर संयोजक रितेश चौकशे यांच्यासह इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.