रिसोड (Risod):- सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांच्या जयंतीनिमित्त नतमस्तक होण्यासाठी 12 जानेवारीला लाखो जनसमुदाय येत असतो. त्यामुळे सहाजिकच जिजाऊ सृष्टी परिसरात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लॅस्टिक इतर कागद कचरा परिसरात पसरतो. त्यामुळे स्थानिक प्रशासन व्यवस्थेवर ताण येतो, म्हणून जिजाऊ जन्मस्थळ आणि जिजाऊ सृष्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जिजाऊ सृष्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
हि स्वच्छता मोहिमेचे आयोजन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे , आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजे एमकेसीएल यांचे संयुक्त विद्यामानाने करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील सारथी आणि एमकेसीएल (MKCL)अधिकृत प्रशिक्षण केंद्र स्कॉलर कंप्यूटर रिसोड, आणि विदर्भ कंप्युटर वाशिम मधील मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोफत असलेल्या CSMS-DEEP संगणक डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसह केंद्र संचालकांनी साफसफाईचे काम दिवसभर केले, जमा झालेला कचरा एकत्रित करण्यात आला, व त्याचे वर्गीकरून करून त्याची व्यवस्था करण्यात आली.
जमा झालेला कचरा एकत्रित करण्यात आला, व त्याचे वर्गीकरून करून त्याची व्यवस्था करण्यात आली
यावेळी श्री अशोक काकडे साहेब संचालकीय व्यवस्थापक सारथी, डॉ श्रीकांत देशमुख प्रकल्प संचालक सारथी, कदम साहेब सारथी, एमकेसीएल अमरावती विभागाचे समन्वयक देवेंद्र पठारे, व्यवस्थापक मनोज जाधव, स्कॉलर कंप्यूटर रिसोड चे संचालक दिनेश देशमुख, विदर्भ कंप्युटर वाशिम चे संचालक विनोद सदार, तसेच महाराष्ट्रातील सारथीचे पिएचडी चे आणि एमकेसीएल चे विद्यार्थी व केंद्र संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल जिजाऊ सृष्टी चे व्यवस्थापक सुभाष कोल्हे , जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योती जाधव यांनी सारथी आणि mkcl च्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. व सर्वांचे आभार मानले, यानंतर दरवर्षी हि साफ सफाई सिंदखेडराजा तसेच रायगड, शिवनेरी सह महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर राबविण्याची शपथ सर्वांनी घेतली.