परभणी/जिंतूर (Parbhani):- शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर रोजी जिंतूर बंदचे आयोजन करण्यात आले होते बंदला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्यामुळे बंद उत्स्फुर्तपणे पाळण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना मराठा आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्च्या काढून प्रशासनाला निवेदन
मराठा समाजाला ओबीसी (OBC)प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे सगेसोयरे अध्यादेश लागू करावा,हैदराबाद गॅजेटचा समावेश करावा आदी मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे 17 सप्टेंबर पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत उपोषणाच्या सहाव्या दिवसा पर्यंत राज्य सरकारे दखल घेतली नसल्यामुळे प्रकृती खालावत चाललेली आहे परिणामी मराठा समाज आक्रमक झाला आहे म्हणून जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर बंदचे आयोजन केले होते यावेळी सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा यलदरी रोड,मेन चौक,पोलीस ठाणे मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार राजेश सरोदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले मोर्च्या मध्ये गोंधळाची जागर करण्यात आला आजच्या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला बंद व मोर्चासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता