परभणी/जिंतूर (Jintur Accident) : हरण आडवे आल्याने धडक होऊन मोटारसायकल स्वार आणि हरीण दोघेही गंभीर जखमी होऊन दोघांचाही मूर्त्यु .हरिणाला मोटार सायकलची धडक बसून हरीण व एक माणूस जागीच ठार झाले. जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा येथील अरुण रामराव वाघमारे वय ४८ वर्ष हे रात्री १:३० वाजताच्या दरम्यान परभणी येथून परत गावाकडे जाता वेळस आडगाव ते टाकळखोपा रस्त्यावर गट क्र,११२ येथे हरीण व मोटारसायकलची धडक लागून (Jintur Accident) अपघात झाला.
सविस्तर माहिती अशी अरुण वाघमारे यांच्या भावाला ह्र्दय विकाराचा झटका आला होता. त्यांना परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करून रात्रीच्या वेळेस गावाकडे परत येत असताना हा अपघात घडला आहे.त्यांच्या गाडीच्या माघेच कृरुझर गाडीत घरातील सदस्य होते. त्यांनीच (Jintur Accident) अपघात होताच त्याच गाडीत टाकून, परभणी येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.परभणी येथील डॉक्टर यांनी तपासणी करून अरुण वाघमारे याना मयत घोसीत केले.
सकाळी आडगाव येथील पशुवैधकीय अधिकारी यांनी हरिणाचे शवविच्छेदन केलं.यावेळी वनरक्षक अंकुश जाधव, वनमजूर हमीद शेख यांनी पंचनामा केला. (Jintur Accident) घटना स्थळाला जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकळे यांनी भेट दिली. आडगाव बाजारचे बिट जमादार यशवंत वाघमारे याना माहिती मिळताच त्यांनी परभणी येथील शासकीय रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनी मयताचे शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या स्वाधीन केले. अरुण वाघमारे यांच्यावर टाकळखोपा येथे अत्यंत संस्कार करण्यात आले. अरुण वाघमारे यांच्या पच्छात पत्नी तीन मुलं असा परिवार आहे.
