बँक पास बुक, नवीन खाते, खात्याची केवायासी करण्याहाठी बॅकेत रांगा
जिंतूर (CM Ladki Bahin Yojana) : राज्य सरकारने एक जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Ladki Bahin Yojana) योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची गर्दी उसळली आहे. जिंतूर तालुक्यातील विविध भागात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असताना, या योजनेसाठी लागणारे बँक पास बुक झेरॉक्स, खाते क्रमांक आदींची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर महिलांनी बँक खाते उघडले नसल्याने व खात्याची केवायासी न केल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे.
जिंतूर तालुक्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बँकेत तोबा गर्दी होत आहे. तर, यापूर्वी ज्या महिलांनी बँक खाते उघडले होते. परंतु, त्याचा वापर केला नाही. त्यामुळे ते खाते नव्याने चालू ठेवण्यासाठीदेखील महिलांची लगबग सुरु झाली आहेत. त्यासाठी केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. (CM Ladki Bahin Yojana) अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचार्यांची दमछाक होऊ लागली आहे.
दैनंदिन कामांबरोबरच या योजनेसाठी नवीन खाते उघडण्यासाठी व बंद असलेले खाते चालू ठेवताना कर्मचार्यांची तारेवरची कसरत होत आहे. तर यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मोठी अडचण होत असुन लहान मुलाबाळांना घेवून दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे (CM Ladki Bahin Yojana) लाडक्या मुख्यमंञी भावाने कागदपञाचा ञास कमी करावा, अशी विनंती लाडक्या बहिणी कडुन होत आहे.