परभणीतील जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे तांडा येथील घटना
परभणी (Jintur Crime Case) : तु लईच मोठा कार्यकर्ता व्हायलास असे म्हणत एकाला मारहाण करुन चाकुने वार करण्यात आले. ही घटना जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे तांडा येथे घडली. या प्रकरणी ७ नोव्हेंबरला बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास पवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गावात दसरा कार्यक्रमानिमित्त जेवण होते. फिर्यादी सदर जेवणाला गेले असताना आरोपीने त्यांना फोन करुन घराबाहेर बोलावले. यानंतर तु लईच मोठा कार्यकर्ता व्हायला, असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. (Jintur Crime Case) लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. याच दरम्यान एकाने घरातून सुरी आणून फिर्यादीच्या पोटावर वार केले. तसेच दुसरा वार हातावर झाल्याने दुखापत झाली. जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी नितीन राठोड, आण्णासाहेब राठोड, लताबाई राठोड, रोहिदास राठोड यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.