परभणीतील जिंतूर तालुक्यातील खरदडी येथील घटना
परभणी/जिंतूर (Jintur Crime) : अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करत घरातील सोन्या – चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून ६४ हजार रुपयांचा (Jintur Crime) मुद्देमाल लंपास केला. ही घटना जिंतूर तालुक्यातील खरदडी येथे मंगळवार ६ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. सदर प्रकरणी (Jintur Police) जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल विठ्ठल राठोड यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी हे ५ ऑगस्ट रोजी रात्री नेहमी प्रमाणे आपल्या परिवारासह झोपी गेले. ६ ऑगस्टला पहाटे पाचच्या सुमारास फिर्यादीच्या पत्नी उठल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. पत्नीने फिर्यादीला उठविले. त्यानंतर घरातील साहित्याची पाहणी केली असता लोखंडी पेटी चोरीला (Jintur Crime) गेल्याचे दिसून आले. या पेटीमध्ये एक तोळ्याची एकदाणी, सेवणपीस, दंडकडे, पायातील चैन आणि रोख पंधरा हजार रुपये मिळून ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर (Jintur Police) जिंतूर पोलीस ठाणे गाठत अनोळखी चोरट्या विरुध्द तक्रार देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.