परभणीच्या जिंतूर बस स्थानकामधील घटना
परभणी/जिंतूर (Jintur Crime) : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाजवळील ३७ हजार ५०० रुपयाची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना जिंतूर येथील बसस्थानकामध्ये घडली. सदर प्रकरणी ५ ऑगस्ट रोजी अनोळखी चोरट्यावर (Jintur Police) जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेभाऊ जनार्धन होले रा.येलदरी कॅम्प यांनी तक्रार दिली आहे.
अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल
फिर्यादी हे म्हैस खरेदी करण्यासाठी काही रक्कम घेऊन परभणी येथील पशु बाजारात आले होते. त्यांनी म्हैस खरेदी केली नाही. दुपारी परभणी येथून (Jintur Crime) जिंतूरला गेले. या ठिकाणी बसस्थानकात तपासणी केली असता त्यांच्याजवळ रोकड होती. त्यानंतर ते येलदरी कॅम्पला जाण्यासाठी बसमध्ये बसले. मानकेश्वरच्या समोर गाडी गेल्यावर रोकड तपासली असता त्यांना रक्कम आढळून आली नाही. बसमध्ये त्यांनी रक्कम शोधली मात्र पैसे मिळाली नाही. जिंतूर येथील बस स्थानकात गाडीमध्ये चढत असताना अनोळखीने रक्कम लंपास केल्याची तक्रार (Jintur Police) जिंतूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.