परभणी/जिंतूर (Jintur Crime) : शहरातील बलसा रोड परिसरात दोन युवकात तीक्ष्ण हत्यारांनी एकमेकावर वार (Jintur Crime) करून मारहाण करण्यात आली होती यात दोघेही गंभीर जखमी झाले होते त्यांच्या वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात (Jintur Hospital) हलविल्याची घटना दि. ०१ जुलै रोजी घडली होती त्यानंतर दोघांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी विरोधी पोलिसात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील बलसा रोड परिसरात दोन युवकांत शाब्दिक चकमक उडाली व (Jintur Police) या वादाचे रुपांतर दोघांनी एकमेकांविरुद्ध धारदार शस्त्राने मारहाण झाली होती दरम्यान (Jintur Hospital) ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याची घटना दि.१ जुलै संध्याकाळी ४;३० च्या सुमारास घडली होती.रात्री उपचार सुरू असताना फिर्यादी पोलिस दलातील जवान सोमनाथ शिवाजी बुरकुंडे वय ४० वर्षे रा.गवळी गल्ली जिंतूर (धंदा नौकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे कि, फिर्यादीच्या भाचीच्या लग्नात मध्ये कोणत्याच प्रकारचे मानसन्मान दिला नाही म्हणून आरोपी उद्धव उर्फ गांधी माधव रोकडे यांनी हातातील धारदार चाकूने मानाच्या उजव्या बाजूवर वार करून गंभीर जखमी केले तर कृष्णा रोकडे यांनी फिर्यादीचे हात धरले व दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सीआर नंबर ४०१, कलम ११८ (२),३५१ (२),(३),३(५) भा.न.स.नुसार गुन्हा नोंद (Jintur Police) करण्यात आला असून, पुढील तपास पो.नि.बुध्दीराज सुकाळे करत आहे.तर दुसरी फिर्याद उद्धव उर्फ गांधी माधव रोकडे वय ३६ वर्षे रा. गवळी गल्ली यांनी उपचार सुरू असताना दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की सोमनाथ बुरकुंडे यांना मी हात उसने दोन लाख रुपये मागण्याच्या कारणावरून त्यांनी शिवीगाळ करून चाकूने फिर्यादीच्या पोटाच्या उजव्या बाजूला मारून गंभीर जखमी केल्याचे नमूद करण्यात आले. त्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पि.एस आय.देशपांडे करत आहे. पोलीस ठाण्यात पहिल्याच दिवशी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ नुसार दोन गुन्हे नोंद करण्यात आल्याचे घटना घडली आहे.