परभणी/जिंतूर (Jintur Death) : तालुक्यातील येलदरी शिवारामधील किन्ही रस्त्यावर २५ ते ३० वर्षीय वयाच्या (Jintur Death) अनोळखी महिलेचा मृतदेह बुधवार १२ जून रोजी सकाळच्या सुमारास आढळून आला. महिलेची ओळख पटलेली नाही. महिलेच्या मृत्युमागे घातपाताचा संशय असून (Jintur Police) पोलीस मयताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
मयत महिलेची ओळख पटेना
माहितीनुसार, येलदरी येथून किन्हीला जाण्यासाठी जलाशयाच्या बाजुने एक रस्ता आहे. या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. मंगळवारी अज्ञातांनी या महिलेचा (Jintur Death) मृतदेह सदर रस्त्यावर आणून टाकल्याचा अंदाज आहे. मयत महिलेच्या तोंडाला माती लागलेली आहे. ओढणीने गळा अवळून तिचा खून (Jintur Crime) केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. मयत महिलेचा रंग गोरा असून तिच्या उजव्या हातावर तीन चांदण्या गोेंदलेल्या आहेत. महिलेजवळ तिची ओळख पटेल, असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही.
मृत्युमागे घातपात असल्याचा संशय
घटनास्थळाला (Jintur Police) अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सेलुचे उपविभागीय पोलीस अधिकारी, जिंतूर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी भेट दिली. सदर महिले बाबत कोणाला काही माहित असेल तर जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आला आहे.