जिंतूर (Jintur Death) : तालुक्यातील येलदरी येथील शेळ्या चारणाऱ्या वयोवृद्ध गुरख्याचा विज पडून मृत्यू झाल्याची (Jintur Accident) घटना दिनांक 10 जून रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील यलदरी येथील रहिवासी असलेले वयोवृध्द गुराखी धोंडिबा रामभाऊ वाकळे वय 70 वर्ष हे नेहमी प्रमाणे येलदरी शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते.
परभणीच्या-येलदरी शिवारातील घटना
दरम्यान दुपारच्या सुमारास वातावरणात बदल झाल्यामुळे विजांचा कडकडाट झाला. याच वेळी त्यांच्या अंगावर (lightning) विज पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी चार मुली असा परिवार आहे.