परभणीच्या जिंतूर तालुक्यातील 12 परीक्षा केंद्राची समान अवस्था
जिंतूर (Jintur Exam center) : तालुक्यातील काही चर्चित संवेदनशील परीक्षा केंद्रामुळे दहावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षण विभाग हाईअलर्टवर आहे. परंतु परीक्षार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात पोलीस दलाने उदासीनतेचे धोरण अवलंबून दहावीच्या परीक्षेत बसलेल्या चार हजार दोनशे साठ परीक्षार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृहरक्षक दलाकडे सोपवून धन्यता मानल्याने तालुक्यातील 12 ही (Jintur Exam center) परीक्षा केंद्रावर गृहरक्षक दलातील कर्मचार्यांचाच बोलबाला दिसून येत आहे.
यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या सुरुवातीपासूनच काही बहुचर्चित संवेदनशील (Jintur Exam center) परीक्षा केंद्रामुळे परभणी जिल्हा शिक्षण विभाग हाईअलर्टवर होता. सदरील परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागातील दिग्गज अधिकाऱ्यांनी विशेष डोळा लावून तब्बल तीन तीन तास परीक्षा केंद्रावर बसून गैरकृत्य करणाऱ्या परीक्षार्थी आणि पर्यवेक्षकांवर कारवाई केली. परंतु मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाने अतिदक्ष राहायला पाहिजे.
पण जिंतूर तालुक्यातील परिस्थिती याउलट पहावयास मिळाली कारण यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत 12 परीक्षा केंद्रावर (Jintur Exam center) सुमारे चार हजार दोनशे साठ परीक्षार्थी परीक्षा देत आहे त्यात जवळपास निम्मे परीक्षार्थी विद्यार्थिनी आहेत आणि विशेष म्हणजे काही विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातून ये जा करत आहे. परंतु गोष्टीच्या गंभीर्यकडे दुर्लक्ष करून तालुक्यातील 12 ही परीक्षा केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस दलाने गृहरक्षक दलाकडे सोपवून धन्यता मानली यावरून हे समजून येईल की पोलीस दल महिलेच्या सुरक्षेसंदर्भात किती दक्ष आहे. पोलीस दलाच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे बहुतांश पालक (Jintur Exam center) परीक्षा केंद्रावर आपल्या परीक्षार्थ्यां सोडायला आणि न्यायला आल्याचे दिसून आले.