प्रतिनिधी जिंतूर (Jintur Gov Hostel ) : परभणी/जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन शिक्षणा ऐवजी (Government College) महाविद्यालयातील दोन गटांतील मारझोडीच्या प्रकरणात नेहमीच चर्चेत राहिले आहे, यावेळी मात्र चक्क विद्यार्थ्यांनीच शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहाची तोडफोड करून जाळले असल्याचा आरोप तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. टी. पाचकोर यांनी दिनांक 31 मे रोजी घडल्या प्रकाराबाबत (Jintur Police) पोलिसांकडे एका तक्रार पत्रावरून केला आहे.
प्राचार्यांची त्यांच्याच विद्यार्थ्यां विरोधात पोलिसांकडे धाव
माहितीनुसार, शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government College) विद्यार्थी मुलामुलींच्या (Gov Hostel) निवासासाठी सुसज्ज असे (Jintur Police) शासकीय वस्तीगृह बांधण्यात आले आहेत.मुलींचे वस्तीगृह सद्या रिक्त असून मुलांच्या तीन मजली वस्तीगृहात सर्व शाखेचे मिळून दीडशेच्या आसपास विद्यार्थी राहतात. दि 28 मे रोजी रोजी वार्षिक परीक्षेचा अंतीम पेपर होता. त्याच दिवशी तीन मजली इमारत असलेल्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर असणाऱ्या एकूण वीस खोल्यांपैकी सहा ते सात खोल्यांतील विद्युत बोर्ड, कपाट, संडास बाथरुम मधील कमोड पाईप लाईनची तोडफोड करून सामान ठेवण्याचे लाकडी कपाट जळाले आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना
ही बाब दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर टी. पाचकोर यांनी पोलिसांत धाव घेऊन जाळपोळ करून तोडफोड करणाऱ्या त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे, शासकीय वस्तू बेचिराख करणे, यांसारखे दखलपात्र गुन्हे नोंद करून दोषींवर कठोर कारवाईचे आरोप निश्चित करण्यासाठी (Jintur Police) जिंतूर पोलिसांत तक्रार पत्र पाठवले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून पोलिसांना दिलेल्या तक्रार पत्रानुसार गुन्हा दाखल झाला तर अनेक विद्यार्थांचे भविष्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सिद्ध होऊन आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्राचार्यांच्या तक्रारी कडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यावर जिंतूर साबा बांधकाम विभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करून अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी (Jintur Police) पोलिसांकडून अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.