परभणी/जिंतूर (Jintur Heavy Rain) : औंढा महामार्ग रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र काम संथ गतीने सुरू आहे. दरम्यान (Jintur Parbhani Road) पाचेगाव जवळ पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. परंतु दिनांक 15 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास (Heavy Rain) जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पाचेगाव रेपा परिसरात असलेल्या महामार्ग रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मातीचा बांधलेला पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
परिणामी वाहनधारक व प्रवासी नागरिक तसेच या (Jintur Parbhani Road) परिसरातील नागरिकांना त्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्यादा वाहतूक ठप्प झाल्याने या परिसरातील रस्ता व पुलाचे काम त्वरित करण्यात यावे, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे.