नागरीकांची हेळसांड तात्काळ थांबवून सुविधा उपलब्ध करा – मा.आ.विजयराव भांबळे
जिंतूर (Jintur Mahavitaran) : परभणी/जिंतूर शहरातील महावितरण (Mahavitaran) व नगर परिषद (Nagar Parishad) अंतर्गत नागरीकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवून नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करा यासाठी मा. आ. विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) जिंतूर यांच्या मार्फत तहसीलदार जिंतूर यांना लेखी निवेदन देण्यात आले. जिंतूर शहरात गेली अनेक दिवसापासून नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात प्रशासन दुर्लक्ष करत असून नागरिक होरपळून निघाले आहेत. त्यात महावितरण (MSEB) च्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही.
शहरातील अनेक भागातील वीज २४-२४ तास गायब होत आहे. एवढी प्रचंड गर्मी असताना वीज नसल्याने वयोवृद्ध, बालक, महिला व नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रभागातील ट्रान्सफार्मर लोडने जळाले आहेत. तर अनेक ट्रान्सफार्मर १०-१० मिनिटास ट्रीप होत आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाणे विजपुरवठा होत असल्याने अनेक महागडी उपकरणे जळत आहेत. अनेक ट्रान्सफार्मर वर कीटकॅंट, स्वीच, केबल नाहीत. अनेक प्रभागातील तार तुटले आहेत. अनेक ठिकाणी खांब मोडले आहेत तर काही ठिकाणी तार जमिनीला टेकण्यास लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा धक्का लागून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. महावितरण (MSEB) कार्यालयात कनिष्ठ अभियंता, लाईनमन, व वर्कर यांच्या पोष्ट रिकाम्या आहेत.
तसेच जिंतूर शहरात नगर परिषद (Nagar Parishad) मार्फत एवढा तीव्र उन्हाळा असताना देखील 15-15 दिवस पिण्याचे पाणी येत नाही. सांड पाणी रस्त्यावर येत असून शहरात दुर्गंधी पसरली आहे. कचरा गोळा करण्यासाठी असलेली यंत्रणा कोलमडली असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली नाल्या तोडल्या असून त्या अद्याप नवीन बांधकाम केल्या नसल्याने शहरातील सर्व घाण पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. सफाई कामगार व इतर नगर परिषदचे कर्मचारी यांना वेतन नसल्याने अनेक कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे नागरिक हवालदिल झाला असून २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा. जळालेली सर्व ट्रान्सफार्मर तात्काळ भरून पूर्ववत सुरु करण्यात यावीत. सर्व ट्रान्सफार्मर ला कीटकॅंट, केबल नवीन टाकण्यात यावेत. सर्व ट्रान्सफार्मरला ए.बी. स्वीच नवीन टाकण्यात यावेत. तुटलेले तार व मोडलेले खांब नव्याने बसवण्यात यावेत. (Mahavitaran) महावितरण कार्यालयात उप-विभागीय अभियंता यांनी पूर्ण वेळ देण्यास आदेशित करावे. महावितरण कर्मचारी यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात. (Nagar Parishad) नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी व इतर सर्व कर्मचारी पूर्ण वेळ देण्यात यावेत. पिण्याचे पाणी स्वच्छ व नियमित सोडण्यात यावे. शहरातील स्वच्छता राखण्यात यावी त्यासाठी प्रत्येक प्रभाग/वार्ड/गल्ली निहाय कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी सर्व प्रभागात पाठविण्यात यावी. शहरातील सर्व नाल्या/गटारे तात्काळ उपसण्यात यावेत.
शहातील तोडलेल्या नाल्या तात्काळ बांधून घेण्यात याव्यात. शहरातील सांड पाणी व पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. विविध योजने अंतर्गत (रमाई आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना व इतर) मंजूर असलेले घरकुल हप्ते विशेषतः 5 वा हप्ता तात्काळ टाकण्यात यावा. ई. नगर परिषद हद्दीतील बऱ्याच स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. जिंतूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यावर तात्काळ मुरूम टाकण्यात यावा. जालना रोडच्या दोन्ही साईडची नवीन नाली बांधण्यात यावी,. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते टिपू सुलतान चौक रस्त्याच्या नाल्या पूर्ववत करण्यात याव्यात. बांधकाम कामगार यांना लेबर कार्ड काढण्यासाठी व रिन्यूव करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे. संजय गांधी व श्रावणबाळ योजने अंतर्गत जिंतूर शहरातील बंद झालेल्या लाभार्थ्यांच्या पगारी तात्काळ चालू करण्यात याव्यात. जन्म मृत्यू नोंदीची प्रकरणे (जाहीर प्रगटन, आदेश) तात्काळ निपटन्यात यावीत. जिंतूर शहरात धूर फवारणी करण्यात यावी अश्या अनेक मागण्या या निवेदनाद्वारे केल्या.
सर्व मागण्या दि.०५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) जिंतूर यांच्या वतीने कायदेशीर मार्गाने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी रामराव उबाळे, मुरलीधर मते, गणेशराव ईलग, बाळासाहेब भांबळे, मनीषाताई केंद्रे, आशाताई खिल्लारे, हमीदा मुसा अन्सारी, विजय खिस्ते, गंगाप्रसाद घुगे, चंद्रकांत बहिरट, लखुजी जाधव, दत्तराव काळे, इस्माईल शेख, दलमीर पठाण, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, अहेमद बागवान, मनोहर सातपुते, शौकत लाला, बालाजी सांगळे, अक्कू लाला, माधवराव घोगरे, मकसूद पठाण, खय्युम कादरी, सलीम भाई, गंगाधरराव तरटे, प्रवीण चव्हाण, वासेफोद्दिन काझी, गजानन कुटे, जावेद खां पठाण, सय्यद अली, अविनाश मस्के, पंडित जाधव, शिवाजी ढवळे, मुन्ना पहेलवान, बबलू कदम, साहेबराव चव्हाण, सुधाकर मस्के, हकीम लाला, अशोक प्रधान, शाहेद सिद्धिकी, शेख सुलेमान, सय्यद नईम कादरी, रफिक बेग मिर्झा, अरबाज खान, शोएब खान, इमरान खान, तादिल पठाण, रियाज पठाण, रफिक मिर्झा, बबनराव राख, संजय राठोड, श्रीहरी बुधवंत, खालेक राज, वासिम खान, इरफान खान, हिमायत बेग, हबीब शेख, करीम लाला, खुर्शिद भाई,,, उद्धवराव कुटे, सय्यद तय्यब खां, अंकुश पवार, अनिस खां पठाण, इसा खान पठाण, सय्यद मोहसीन, इम्तियाज, भुरा भाई, बाळासाहेब जाधव, अकबर कुरेशी, हमीद बेग, नितीन दवंडे, सिद्धार्थ घनसावंत तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.