परभणी (Jintur Police Case) : व्यापार्या जवळून सरकी ढेप खरेदी केल्यानंतर या मालाचे ९ लाख २२ हजार ९४० रूपये न देता जिंतूर येथील व्यापार्याची फसवणूक केली. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी दोन आरोपींवर (Jintur Police Case) जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंजनकुमार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे त्रिलोक कॉटन प्रा. लि. जिंतूर येथे व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. आरोपी दलाल निरज धुत आणि योगिता ट्रडिंग कंपनीचा मालक जेठराम नायक या दोघांनी फिर्यादी जवळून सरकी ढेप खरेदी केली. या मालाचे ९ लाख २२ हजार ९४० रूपये झाले. (Jintur Police Case) आरोपींनी फिर्यादीला बँक खात्यात पैसे टाकल्या जातील, असे सांगीतले. वारंवार पैशाची मागणी करूनही रक्कम पाठविण्यात आली नाही. सदर आरोपींनी यापुर्वी देखील इतरांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पुढे आले. अखेर फिर्यादीने जिंतूर पोलीस ठाणे गाठत आरोपींवर तक्रार दाखल केली. तपास सपोनि. पुंड करत आहेत.