परभणीच्या जिंतूर पोलिसांची मोठी कार्यवाही दोन आरोपी फरार
परभणी/जिंतूर (Jintur Police) : तालुक्यातील ईटोली परिसरात हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळताच कार्यवाही करत (Jintur Police) पोलिसांनी हातभट्टीसह दारू बनवण्यासाठीचे रसायन नष्ट करून हातभट्टीचा अड्डा उद्धवस्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत. ही घटना दिनांक 25 ऑगष्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील ईटोली येथे मागील काही दिवसांपासून हातभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता याची गोपनीय माहिती मिळताच (Jintur Police) पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिसांनी मोठी कार्यवाही केली यावेळी जवळपास 1 हजार लिटर हातभट्टीसाठीचे रसायन व 150 लिटर हातभट्टी जागेवरच नष्ट करण्यात आली असून हातभट्टीचा अड्डा उद्धवस्त केला आहे आहेत.
दरम्यान पोलीस हवालदार यशवंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरून दीपक जयस्वाल व रेखा जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत या कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, सपोनि जाधव ए एस आय जक्केवाड,पोलीस हवालदार गुंगाने,वाघमारे,वाटोडे,पोशी उमेश जाधव यांनी कार्यवाही केली एकंदरीत (Jintur Police) जिंतूर पोलिसांच्या धडक कार्यवाहीमुळे अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत