परभणी/जिंतूर (Jintur police station) : येथे अल्पवयीन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तीस भररस्त्यात थांबवून दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेले घड्याळ भेट म्हणून घे अन्यथा तुला जीवे मारतो म्हणून तिच्या पाठीवर थाप मारणाऱ्या आरोपी विरोधात (Jintur police) जिंतूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार दि 28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
याबाबत मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांची अल्पवयीन मुलगी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील एका शाळेत जात असताना रस्त्यात आरोपी शेख फिरदोस शेख साबेर याने त्याची दुचाकी क्रमांक एम एस 26 बी डब्ल्यू 5996 ही भर रस्त्यात थांबवून तिच्या पेट्रोल टाकीवर एक घड्याळ ठेवले व सदरील मुलगी तिथून जात असताना तू हे घड्याळ भेट म्हणून स्वीकार अन्यथा तुला व तुझ्या आई-वडिलांना मी जीवे मारतो असे म्हणून धमकी दिली यावेळी मुलगी रडत असल्याचे पाहून परिसरातील तरुणांनी धटनास्थळी धाव घेत तिची समजूत काढून तिस शाळेत पाठवले व सदरील प्रकार तिच्या कुटूंबियांना सांगितला.वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख फिरदोस शेख साबेर याच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळी (Jintur police) उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीक्षा लोकडे ह्या पुढील तपास करीत आहेत.
दामिनी पथक केवळ नावालाच
गेल्या अनेक वर्षापासून दामिनी पथक कार्यरत नसल्याने शाळा महाविद्याल परिसर, येण्या जाण्याच्या रस्त्यावर तसेच खाजगी शिकवणी वर्गातच्या रस्त्यावर टवाळखोर तरुणांचे टोळके उभे राहत असून यांना आवर घालण्यासाठी दामिनी पथक नेमण्यात आले होते. मात्र सध्या दामिनी पथक केवळ नावालाच असल्यामुळे पालकातून नाराजी व्यक्त होत आहे