परभणी/जिंतूर(Parbhani) :- शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. मात्र दुसरीकडे गावातील सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील फुलवाडी गावाजवळील पुलाचे काम न झाल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना (students) जीव धोक्यात घालून आयुष्याचे धडे गिरवावे लागत आहेत. याकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना राजकीय मंडळींना फुरसत. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आडगाव-इटोली जवळपास पाचशे लोकसंख्या असलेले फुलवाडी छोटेसे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता.
पावसाळ्यात खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो
त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून सात लाख रुपये खर्चुन हा रस्ता झाला. मात्र, गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा (Bridge)प्रश्न अधांतरीच राहिला. पुलासाठी मोठा खर्च येत असल्याने व मतदार संख्या कमी असल्याने राजकीय नेतृत्वानेही याकडे लक्ष दिले नाही. या गावातून पहिली ते बारावीपर्यंतचे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये (School)शिक्षणासाठी जातात. काही विद्यार्थी आश्रमशाळेत, काही गडदगव्हाण, तर काही विद्यार्थी आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज जात असतात. पावसाळ्यात खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
ओढ्याला पाऊस, आहे त्या गावात मुक्कमाची वेळ
परिसरात थोडा पाऊस झाला की, ओड्याला पाणी येते. त्यावेळेस विद्यार्थ्यांना कधी गडदगव्हाण, तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो. शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकांनाही पाण्यामुळे गावात येत नाही. पाणी कमी झाल्यानंतर पालकांच्या मदतीने ओढा ओलांडून शाळेत जावे लागते. ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षांपासून या भागातील विद्यार्थी व नागरिक करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पुल मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांसाठीची मानवविकास बस बंद. आडगाव इटोली मार्गावर नेहमी धावणाऱ्या बस व शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मानव विकासच्या बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.
गावात सुविधांचा वानवा जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नाकडे परिषद विभागाचे(council department) दुर्लक्ष एकीकडे कोट्यवधी रुपयांचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत २ रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासकीय, राजकीय पातळीवरही गाव उपेक्षित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.