परभणीच्या जिंतूर विविध पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर
परभणी/जिंतूर (Sharad Pawar) : येथे राष्ट्रवादी काँगे्रस शरदचंद्र पवार पक्षाचा विजयी युवक मेळावा मदनी फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. विजय भांबळे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकज बोराडे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक व राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पदाच्या नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या.
मेळाव्यास माजी आ. विजयराव भांबळे यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकार्यांनी शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे, तसेच पक्षाचा विस्तार करून पक्षाची ध्येय – धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न करावा आणि पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेणे पार पाडावी.
यावेळी अजय चौधरी, रामराव उबाळे, अभिनय राऊत, बाळासाहेब भांबळे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस रितेश काळे, आशाताई खिल्लारे, वैâलास महाराज चारठाणकर, विजय खिस्ते, दत्तराव काळे, ईस्माइल पठाण, मनोहर सातपुते, विश्वंभर पवार, बालाजी सांगळे, हकीम लाला, पिनू काळे, शोयब सिद्दीकी, सचिन बोबडे, सचिन राठोड, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर मते, राहुल घुले, अंकुश पवार, रहिमभाई, बबलू कदम, अरबाज खान आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिंतूर – सेलू विधानसभा पदाधिकारी
विजयी युवक मेळाव्याप्रसंगी माजी आ. विजयराव भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिकारी नियुक्तया करण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सेलू – जिंतूर अभिलाश राऊत दुधगाव, युवक तालुकाध्यक्ष अविनाश मस्के जोगवाडा, तालुका उपाध्यक्ष पिंटू वलेकर, सुरज गायकवाड, तालुका कार्यकारिणी सदस्य विलास घुगे, युवक सरचिटणीस राहुल साबळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष माणिक सानप शेवडी, विद्यार्थी उपाध्यक्ष पवन जाधव, गणेश पालवे आदींना माजी आ. विजयराव भांबळे व पे्रक्षा भांबळे – बोराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी केलेल्या मार्गदर्शनात माजी आ. भांबळे म्हणाले की, तरुण पिढीने शिक्षण, व्यवसाय या बरोबरच राजकारणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सुशिक्षीत युवकांनी राजकारणात येण्याचे आवाहन देखील यावेळी केले.