परभणी रोडावरील 3 दुकाने फोडली; वजनदार साहित्य चारचाकी वाहनातून लंपास!
परभणी (Jintur) : शहरातील परभणी रोडावरील मुख्य व्यापारी परिसरात शुक्रवारी 9 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून सुमारे 06 लाख रुपयांच्या रोख रकमेसह वजनदार साहित्य आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्या.
घटना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!
परभणीतील जिंतूर शहरातील परभणी रोड हे नेहमी नागरिकांनी गजबजलेला परिसर असतांनी ही मध्यरात्रीच्या काळोख्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी अतिशय धंदासीपणाने एकाच रात्री परिसरातील तब्बल तीन दुकाने फोडली. दुकानातील रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य व इतर वजनदार माल चारचाकी वाहनात भरून नेला. शहराच्या मुख्य रस्त्यावरच चोरी (Theft) झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरट्यांनी (Thieves) रात्रीच्या वेळेस अगदी योजनाबद्ध पद्धतीने शटर उचकटून दुकानांमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, व रोख रक्कम असा एकूण सुमारे 06 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेला माल चारचाकी वाहनात भरून नेण्यात आल्यामुळे चोरट्यांनी पूर्वनियोजितरीत्या ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरी करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमध्ये जे के मोटार गॅरेज, विठ्ठल ऍग्रो, प्रधान फर्निचर यांचा समावेश आहे.
चोरट्यांनी फोडले सीसीटीव्ही कॅमेरे!
घटनेची माहिती मिळताच सपोनि जाधव, बीट जमादार पठाण, लहाने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) चोरत्यानी फोडून टाकल्याने पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे टाकणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांत (Local Merchants) संतापाची लाट उसळली असून, त्यांनी शहरात रात्रगस्त वाढवण्याची आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे (Police Administration) केली आहे.