हिंगोली (Jitendra Awad) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णाकृती पुतळा परिसरात (BJP) भारतीय जनता पार्टी आणि रिपाई आठवले गट (Ripai Athawale group) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad)
यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन (Jode Maro Andolan) करत जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी (BJP) भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, शिवाजी मुटकुळे, एडवोकेट के.के शिंदे, उत्तमराव जगताप, माजी जि प सदस्य तथा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ खिल्लारे, माणिक लोडे हिम्मत राठोड, विजय धाकतोडे, नारायण खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.