हिंगोली/जिमाका (District administration) : हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर (Jitendra Papalkar) यांची नुकतीच धुळे येथे बदली झाली असून, जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवार, (दि.१६) रोजी हृदय सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. जितेंद्र पापळकर( Jitendra Papalkar) हे २०१० च्या भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यानंतर २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर अकोला येथे २०१९ ते २०२१ पर्यंत सेवा दिली.
हिंगोली येथे २०२१मध्ये त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्या कार्यकाळात (Hingoli District) हिंगोली येथे ‘बालविवाहमुक्त हिंगोली’, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव, महासंस्कृती, महानाट्य, शासन आपल्या दारी, आणि नुकतीच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे यशस्वी आयोजन त्यांनी केले.
हिंगोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या करण संतोष राऊत, सेवासदन या मुलास एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. जिल्ह्यातील शिवरस्ते, पांधणरस्ते अतिक्रमण हटविणे, तंबाखू मुक्त शाळा करणेसाठी प्रयत्न, लोकसहभागातून वनराई बंधारा बांधून पाणी आडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच समाजातील अतिशय दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग, तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, दुर्धर आजारग्रस्त असलेल्यांना धान्य वाटप, क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. या शिवाय वृक्ष लागवड, जलजिवन मिशनची यशस्वी अंमलबजावणी आणि जिल्हा अँनिमीयामुक्त करण्याबाबत त्यांनी खास प्रयत्न केले आहेत.