जिवती (Jivati Crime) : सोयरीक मोडल्याचा राग मनात धरून जिवती येथील एका (Jivati Medical) मेडिकल चालकांच्या मेडीकल मध्ये घुसून रोडगुडा येथील एकाच परिवारातील सात जणांनी सामुहिक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सात जणांवर भादवी कलम ४५२, १४३, १४७, १४९, ३२४, ४२७, ५०४, ५०६ नुसार जिवती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार जिवती येथे सय्यदहजरत अली सय्यद शेरअली धावडे यांचे मुख्य मार्गावर मेडिकलचे दुकान आहे. शुक्रवारी ५.०० वाजताच्या दरम्यान रोडगुडा येथील नबीघासी सय्यद यांच्यासह त्यांच्या परिवारातील सात जण दोन चारचाकी वाहन घेऊन मेडीकल समोर थांबवत अचानक सर्वच जण (Jivati Medical) मेडिकलध्ये घुसले.
मेडिकलध्ये (Jivati Medical) असलेले सिसिटिव्ही कॅमेराचे केबल वायर तोडत सोयरीक का मोडली असे म्हणत शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करू लागल्याने माझे नातेवाईक महिला व पुतण्या दुकानाकडे आले. झगडा सोडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी लोखंडी रॉडने महिलांना मारले. लियाकत अली सय्यद यांना प्लास्टिक खुर्च्यीने डोक्यावर मारून जखमी केले. मेडिकलमध्ये असलेल्या मौल्यवान किंमतीचे लॅपटॉप व मॉनिटर सह इतर साहित्यांची तोडफोड करून आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले असून याप्रकरणी रोडगुडा येथील नबीघांसी सय्यद,रियाज उर्फ राजा घांसी सय्यद, इस्माईल घांसी सय्यद, उस्मान घांसी सय्यद, तस्लीम नबि सय्यद, आयेशा सय्यद, बानु सय्यद अशा सात जणांवर जिवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास (Jivati Police) जिवती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाराशींग राजपूत करित आहे.