कोलकातापाठोपाठ जोधपूरच्या रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जोधपूर (Jodhpur rape case) : कोलकातापाठोपाठ राजस्थानच्या जोधपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. जोधपूरच्या सरकारी रुग्णालय परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (minor girl gang-raped) झाल्याची घटना समोर आली आहे. आईने शिवीगाळ केल्याने संतापलेली पीडित मुलगी घरातून निघून गेली होती.
या प्रकरणात (Jodhpur rape case) रुग्णालयातील दोन सफाई कामगारांवर संशय आहे. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. माहितीनुसार, सुमारे 15 वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी काही कारणावरून शिवीगाळ केली होती. याचा राग येऊन सायंकाळी ती न सांगता घरातून निघून गेली. रात्री ती जोधपूरच्या महात्मा गांधी हॉस्पिटलच्या आवारात पोहोचली, तिथे दोन्ही तरुणांना मुलगी एकटी दिसली.
घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलासोबत घडली घटना
आरोपींची ओळख सफाई कामगार म्हणून झाली आहे. परंतु रुग्णालयाचे अधीक्षक फतेहसिंग भाटी सांगतात की, आरोपींपैकी एक पूर्वी आमच्यासोबत कंत्राटी कामगार होता, तर दुसऱ्याबद्दल कोणतीही माहिती नाही. दोघेही रुग्णालयात काम करत नव्हते. पोलिसांनीही याबाबतची परिस्थिती स्पष्ट केलेली नाही. (Jodhpur rape case) रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असल्याचे रुग्णालय अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्हीची तपासणी केली आहे.
दोन्ही आरोपींनी मुलीला गळ घातलं आणि हॉस्पिटलच्या आवारात कैदी वॉर्डजवळ असलेल्या कोठडीसारख्या ठिकाणी नेले. जिथे दोन्ही तरुणांनी मुलीवर बलात्कार केला. मग तिला सोडले. दुसरीकडे पीडित मुलगी (minor girl gang-raped) घरातून बेपत्ता असल्याचे समजताच वडिलांनी व इतर कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र मुलगी सापडली नाही. वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि एफआयआर दाखल केला.
पीडित मुलगी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलच्या आवारात एकटीच फिरताना आढळली. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले आणि त्याच्या कुटुंबीयांना बोलावले. पोलिसांनी तपास करून पीडितेचे जबाब घेतले असता, तिने दोन तरुणांवर (Jodhpur rape case) सामूहिक बलात्काराचा आरोप केला. पोलिसांनी अपहरण केल्याबद्दल एफआयआरमध्ये सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो ही कलमे जोडली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी केली.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. एफएसएलने आज मंगळवारी घटनास्थळाचा तपास करून पुरावे गोळा केले. आरोपींची ओळख पटल्यानंतर संभाव्य लपून बसलेल्या ठिकाणी छापे टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याआधी 20 ऑगस्ट रोजी जोधपूरमध्ये एका 3 वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. जोधपूरमध्ये 15 दिवसांत (Jodhpur rape case) अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची ही तिसरी वेळ आहे. आज मंगळवारी (20 ऑगस्ट) प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिफेन्स कॉलनीतील पार्कमध्ये खेळत असताना साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार (minor girl gang-raped) करण्यात आला. या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.