वॉशिंग्टन (Joe Biden) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी सांगितले की, भारत, चीन, जपान आणि रशियाचा ‘झेनोफोबिक’ (xenophobic nationsm) (कोणत्याही गोष्टीची भीती किंवा नापसंत) स्वभाव त्यांच्या आर्थिक समस्यांना जबाबदार आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढत आहे कारण, ती आपल्या मातीत स्थलांतरितांचे स्वागत करते. वॉशिंग्टनमध्ये निधी उभारणीच्या कार्यक्रमात त्यांच्या फेरनिवडणुकीचा प्रचार करताना अध्यक्षांनी हे विधान केले. जर देशांनी इमिग्रेशन अधिक स्वीकारले तर रशिया आणि चीनसह जपानची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल, असा युक्तिवाद केला.
बिडेन (Joe Biden) म्हणाले की, आमची अर्थव्यवस्था (economy) वाढण्याचे एक कारण तुमच्यामुळे आणि इतर अनेक लोकांमुळे आहे. कारण आम्ही स्थलांतरितांचे स्वागत करतो. चीन आर्थिकदृष्ट्या एवढा वाईट का आहे? जपानला समस्या का येत आहेत? रशिया का? (India) भारत का? कारण ते (xenophobic nationsm) झेनोफोबिक आहेत. त्यांना स्थलांतरित नको आहेत.
बिडेन (Joe Biden) पुढे म्हणाले की, स्थलांतरितांमुळे आपल्याला अधिक मजबूत बनते. विनोद नाही. ही अतिशयोक्ती नाही. कारण आमच्याकडे कामगारांचा ओघ आहे ज्यांना इथे रहायचे आहे आणि फक्त योगदान देऊ इच्छित आहे. अमेरिकेच्या राजकारणात इमिग्रेशन हा एक ध्रुवीकरण करणारा मुद्दा आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत तो नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. 2021 पासून दरवर्षी सरासरी 2 दशलक्ष लोक अवैध सीमा ओलांडत आहेत, ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.