चिखली (Buldhana) :- पत्रकार (journalist) आणि पोलीस हे दोघेही अनेक अडी अडचणीचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते.त्यामुळे पोलिस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असे मत साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड यांनी पत्रकार बांधवा सोबत सुसंवाद व्यक्त केला .
उत्सव आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेत साजरा करावे
यावर्षी ईद मिलाद १६ सप्टेंबर आणि गणेश उत्सवाचे विसर्जन १७ सप्टेंबर या दिवशीच्या पार्श्वभूमीवर गावा गावामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडल्या. बैठकीमध्ये ठाणेदार यांनी गणेश उत्सव व ईद मिलाद हे दोन्ही उत्सव आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेत साजरा करावे. त्याच बरोबर डीजेचा (D.J) वापर टाळावा, जेणे करून कोणाला त्रास होईल किंवा कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील असे प्रकार टाळावे तसेच सोशल मीडियाच्या वापर करताना कोणते प्रकारे कोणाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करू नये असे आवाहन केले. त्याच बरोबर पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारामुळेच समाज हा लाईन वर राहतो अनेक गंभीर प्रश्न समाजातील सुटतात त्याकरता प्रशासन पत्रकार यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे. परंतु गावात शांतता राहण्या करिता पोलिस प्रशासनास कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते.असा सुसंवाद ठाणेदार गजानन करेवाड यांनी पत्रकार बांधवा सोबत व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, उपाध्यक्ष अशोकराव इंगळे, पंचाळ सर, प्रल्हाद देशमुख, गंगाधर उबाळे, संतोश गाडेकर राजू मोरे,बिट जमादार निवृत्ती पोफळे , तथा आदी पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होते .