देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maratha Reservation: हिंगोली जिल्हाभरात सकल मराठा समाजाचा जल्लोष
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Maratha Reservation: हिंगोली जिल्हाभरात सकल मराठा समाजाचा जल्लोष

Digital Nagpur
Last updated: 2025/09/03 at 8:27 PM
By Digital Nagpur Published September 3, 2025
Share
Maratha Reservation

मुंबईतून परतताच गावकर्‍यांनी केला जल्लोष 

एक मराठा लाख मराठा-घोषणेने परिसर दुमदुमला

हिंगोली (Maratha Reservation) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. शासनाने आरक्षण जाहिर करताच ३ सप्टेंबर बुधवार रोजी सकल (Maratha Samaj) मराठा समाजाच्या वतीने गावोगावी जल्लोष करण्यात आला. मुंबईत गेलेले गावकरी गावात परतताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच आरक्षणाचा मोठा जल्लोष जिल्हाभरातील गावा गावात पहावयास मिळाला. यावेळी एक मराठा लाख मराठा आशा घोषणांनी गावचा परिसर दणाणुन गेला होता.

सारांश
मुंबईतून परतताच गावकर्‍यांनी केला जल्लोष एक मराठा लाख मराठा-घोषणेने परिसर दुमदुमलापानकनेरगावात मराठा समाज बांधवांचा विजयी जल्लोषकनेरगाव नाका येथे मराठा समाजाचा जल्लोषखानापूरात विजयाचा आनंदोत्सव साजरावसमत येथे मराठा समाजा तर्फे फटाके फोडून केला जल्लोषऔंढा नागनाथ येथे बसस्थानका समोर जल्लोष

पानकनेरगावात मराठा समाज बांधवांचा विजयी जल्लोष

पानकनेरगाव: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी २९ ऑगस्ट पासून संघर्ष योद्धा मनोज जंरांगे पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते २ सप्टेंबर रोजी शासनाने अधिकृत जीआर काढल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले अधिकृत जीआर काढल्यानंतर महाराष्ट्रात मराठा बांधवांकडून जल्लोष पाहायला मिळाला. (Maratha Samaj) मागणीबाबत मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर पानकनेरगांव येथील मराठा बांधवांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील मराठा बांधव ३१ ऑगस्ट रोजा आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते.

तेथील समाज बांधवांची खाणे पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सोबत पोळ्या ठेचा चिवडा फराळाचे वाटप करून सहभागी झाले होते सदर काही तासातच शासनाने जीआर काढल्यानंतर आंदोलन गावी परतल्यानंतर पान कनेरगाव येथे फटाके व बँड लावून विजयोत्सव साजरा केला.व तसेच यावेळीएक मराठा लाख मराठा’ या (Maratha Reservation) घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा मराठा समाजबांधवांनी दिल्या. विजयोत्सवात इतर समाजाच्या लोकांनी सहभाग घेतला होता यावेळी एक मराठा लाख मराठा, आपण जिंकलो, भूमिका ठाम होती, शेवटी नियतीलाही झुकावे लागले असे संदेश देणारे घोषवाक्ये देण्यात आली. तसेच मनोज जरांगे यांचे छायाचित्र हातात घेत ते उंचावत समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला.

कनेरगाव नाका येथे मराठा समाजाचा जल्लोष

कनेरगाव नाका/फाळेगाव: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर कनेरगाव नाका गावातील मराठा समाजाच्या वतीने भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत उत्साही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाचे आभार मानले. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू झालेला जल्लोष ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे हातात घेत उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी पारंपरिक पोशाशाखातील टोपी सहभाग घेत मराठा समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले. मिरवणुकीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.यावेळी बोलताना कनेरगाव नाका येथील बालाजी गावंडे यांनी सांगितले की, ‘मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या संयमी व निर्धारयुक्त उपोषणामुळे मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडे गांभीर्याने मांडल्या गेल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे आरक्षणाच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे.मिरवणुकीच्या शेवटी ग्रामस्थांनी सामूहिकरित्या ‘मनोज जरांगे पाटील यांना सलाम’ अशा घोषणा देत कृतज्ञता व्यक्त केली.

खानापूरात विजयाचा आनंदोत्सव साजरा

खानापूर चित्ता: हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे २ सप्टेंबर रोजी मराठा बांधवांना आरक्षण लागू (Maratha Reservation) झाल्याचे कळताच फटाक्याची आतिषबाजी करून व गुलाल उधळून विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. खानापूर चित्ता येथे २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०५ च्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन व उपोषण उप समितीचे अध्यक्ष विखे पाटील शरबत देऊन सोडल्याने मराठा बांधवांना आरक्षण लागू झाल्याचे कळताच विजयाचा आनंदउत्सव साजरा करण्यात आला. मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणाचा तिढा सुटल्याच्या आनंदात फटाक्याची आतिषबाजी करत वाजत गाजत हनुमान मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विजयाचा आनंदोत्सव गुलाल उधळून करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाचे आंदोलन करीत होते. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील लाखो मराठी मुंबईच्या दिशेने रवानाही झाले होते. मुंबईच्या गल्लीबोळीत मराठा आंदोलकाची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली. लाखो मराठ्याच्या हजेरीने अक्षरशा मुंबई जाम झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मनोज दादा जरांगे पाटलाच्या उपोषणाला चार दिवसाचा कालावधी उलटूनही सरकार तिढा सोडण्यास सामोरे जात नव्हते. परंतु पाचव्या दिवशी मराठा समाज मुंबईतून परतत नसल्याचे चित्र सरकारच्या लक्षात येताच सरकारने आंदोलकाकडे उप समिती मधील अध्यक्ष, व सदस्य यांना आंदोलका शी चर्चा करण्यासाठी एक मसुदा घेऊन पाठविले.

हा मसुदा कायदे तज्ञ यांनी वाचून मसुदा बरोबर आहे परंतु त्याचा जीआर त्वरित निघाला पाहिजे. तरच आंदोलक संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे उपोषण सोडतील अशी चर्चा झाल्यानंतर, काही वेळातच उपसमितीने जीआर मागून घेतल्याने तो जी.आर कायदे तज्ज्ञांनी तपासल्यानंतर बरोबर असल्याची खात्री झाल्याने उपोषण मांगे घेण्यात यावे अशी विनंती वजा करण्यात आली.मिळालेल्या जीआर मध्ये आठ मागण्या पैकी सहा मागण्या शासनाने मान्य केल्याने उपोषण सोडण्यात आले. मराठा आंदोलकाच्या मान्य झाल्याचे वृत्त वृत्तवाहिनीवर झळकताच सगळीकडे विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

वसमत येथे मराठा समाजा तर्फे फटाके फोडून केला जल्लोष

वसमत: मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाची यशस्वी सांगता झाली मागण्या मान्य झाल्या व (Maratha Reservation) आंदोलनाचा मोठा विजय झाला याबद्दल वसमत येथे मराठा समाज बांधवांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. मनोज पाटील जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे उपोषण प्रारंभ केले होते या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता वसमत तालुक्यातील हे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपोषणास सहभागी होण्यासाठी गेले होते.

वसमत येथेही मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी उपोषण प्रारंभ केले होते २ सप्टेंबर रोजी शासनाने मागण्या मान्य केल्या उपोषणाची सांगता झाली. (Maratha Reservation) आरक्षणाची लढाई जिंकल्या बद्दल समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे वसमत येथे मराठा समाज बांधवांनी फटाके वाजवून जल्लोष केला मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले त्याबद्दल मनोज पाटील जरांगे यांचा जयजयकार करण्यात आला तसेच वसमत येथील उपोषण करते रवी किरण वाघमारे यांचेही उपोषण मिटवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.

औंढा नागनाथ येथे बसस्थानका समोर जल्लोष

औंढा नागनाथ: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबई येथील आजाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला यश मिळाले असून राज्य सरकारने आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने या ऐतिहासिक विजयाचा ३ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक परिसरात सकल मराठा समाज बांधवांकडून मोठा जल्लोष करून औंढा नागनाथ शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य विजयी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथास दुग्धाभिषेक करून मिरवणूकीची सांगता करण्यात आली.यावेळी औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Maratha Reservation, Maratha samaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्राईम जगतविदेश

Los Angeles Wildfire: वणव्यामुळे मोठमोठे ठिकाण आगीमुळे जाळून खाक तर अग्निशमन दलाची आगीशी झुंज

Digital Nagpur Digital Nagpur January 10, 2025
Ramgiri Maharaj: जिल्ह्यात रामगिरी महाराजांना अटक करण्यासाठी उपोषण
Social Welfare Department: समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तास मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
Income Tax Recruitment: आता परीक्षेशिवाय, आयकर विभागात नोकरीची संधी.! 81,000 असणार पगार!
Maharashtra Elections 2024: भाजपनंतर महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 5 हमीभाव, जात जनगणनेचे आश्वासन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?