पुसद (Pus river suicide Case) : आज सकाळी 10 वाजता च्या दरम्यान पुसद दिग्रस रोडवरील पूस नदीवरील पुलावरून एका इसमाने नदीत उडी मारून (suicide Case) आत्महत्या केल्याची खळबळजळ घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसद दिग्रस नागपूर रोडवरील पूस नदी वरील पुलावरून मोती नगर येथील रहिवाशी आलू वडापाव चा हातगाडा चालविणारे व्यवसायिक मुन्ना देवेंद्र उर्फ उमेश खिलौसिया वय अंदाजे 50 वर्ष या इसमाने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्येचे नेमके कारण काय हे अस्पष्ट आहे.
मृतक इसमास दोन मुले असून एक विवाहित आहे. तर दुसरा मुलगा व पत्नी बाहेरगावी राहतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह नगरपरिषद प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. नदीमध्ये शोधा शोध करण्यात तरबेज असलेला अफसर या मुलाने शेवटी नदीत उडी घेऊन तब्बल एका तासाने मृतदेह बाहेर काढला. यावेळी नदीवर प्रचंड बघ्यांची गर्दी जमा झाली होती. मृतकाच्या मुलाने वडिलांचा मृतदेह बघून एकच हंबरडा फोडला. यावेळी सर्वसामान्यांचे मन कासावीस झालं. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती तर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पीएम करिता (suicide Case) मृतदेह दाखल करण्यात आला.