गोंदिया(Gondia):- अर्जुनी मोर तालुका छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे “महावाचन” व महावाचनाची शपथ हा उपक्रम घेण्यात आला. सुरवातीला विद्यार्थ्यांची ध्यानधारणा व सुक्ष्म व्यायाम घेण्यात आले.
या उपक्रमामध्ये वर्ग 5 ते 12 चे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी ग्रंथालयातील वेगवेगळी पुस्तके घेऊन महावाचन केलं. सध्या विद्यार्थ्यांची वाचनाची सवय तुटत चाललेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी व मोबाईलचा छंद सुटावा. याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज किमान एक तास तरी एखाद्या पुस्तकाचे वाचन करावं, याकरिताच हा उपक्रम घेण्यात आला. तसेच वाचन झाल्यानंतर त्या पुस्तकावरील अभिप्राय लेखन देखील विद्यार्थ्यांना (Students) करायला सांगण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या महावाचन उपक्रमामध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले.