मानोरा (Washim):- तालुक्यातील मौजे देवठाना ग्रामीण खेडे गावातील शेतकरी कुटुंबातील कबड्डी पट्ट आकाश बाबाराव चव्हाण यांची प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामासाठी बंगाल वॉरिअर्स निवड झाल्याबद्दल दि. २० ऑगस्ट रोजी शहरात भाजपाचे युवा नेते(BJP youth leader) ऍड ज्ञायक पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती कार्यालय ते नाईक नगर पर्यंत काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूक सन्मान रॅलीत शेकडो युवक सहभागी झाले होते.
सन्मान रॅलीत शेकडो युवक सहभागी
पंचायत समितीवरून सन्मान मिरवणुक वाजत गाजत डी. जे. च्या तालावर निघाली. शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फटाक्याची आतिषबाजी करून युवकांनी डी जे च्या तालावर थिरकत जल्लोष साजरा केला. त्यानंतर सन्मान रॅली शहरातून झेंडा चौक मार्गे नाईक नगर कॉलनीत पोहचताच ठिकठिकाणी कबड्डी(Kabaddi) पट्ट आकाश चव्हाण व भाजपाचे ज्ञायक पाटणी यांचे शहर वाशियाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान मिरवणुकीत भाजपाचे तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, जि. प. सदस्य उमेश ठाकरे, तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा सरचिटणीस प्रा सुनिल काळे, भाजपाचे पदाधिकारी सुधाकर चौधरी, अरूण जाधव, स्वप्निल पाटील, गणेश जाधव, श्याम राठोड, अजय जयस्वाल, प्रकाश जाधव, अशोक चव्हाण, डॉ अविनाश लोथे, विजय चव्हाण, संजय हेडा, मुकेश चव्हाण, महेश राठोड, मिलिंद देशमुख, डॉ हरिष नवहाल, नितिन राठोड यांच्यासह शेकडो युवक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांनी आकाश चव्हाण यांचा आदर्श घ्यावा
छोटेसे खेडेगावातून हलाखीची परिस्थिती असताना कबड्डी पट्ट आकाश चव्हाण यांने आपल्या गावाचे व जिल्हयाचे नाव देशात नाव लौकीक केले आहे. आजच्या युवक विद्यार्थ्यानी आपण ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, असे सन्मान रॅलीला संबोधित करतांना युवकांना ज्ञायक पाटणी यांनी आवाहन केले.
युवकांनी आईं – वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावे
आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना जिद्द व चिकाटी उराशी बाळगून आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहिलो, त्यामुळेच यश संपादन करू शकलो. या यशात यशासाठी संघर्ष करतांना सर्वांनी दिलेली साथ मोलाची ठरली. आपले सर्वांचे आशीर्वाद हीच माझी प्रेरणा ठरली. प्रत्येकाने अपयशाला खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून यश संपादन करावे असे भावनिक होवून मोलाचा सल्ला युवकांना दिला.