चिखली (Buldhana) :- सरकार रोड दुरुस्तीवर लाखो करोडो रुपये खर्च करून रोडची दुरूस्ती व डाबरीकरणाचे काम करत आहे. मात्र इकडे चिखली तालुक्यांतील मेरा बु ते गुंजाळा या रोडवरील उखडलेल्या खडीकरणाकडे तसेच रोडवरील अतिक्रमणाकडे(encroachment) जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वातंत्र्यापासून दुर्लक्ष असल्याने रोडची फार दुरवस्था झालेली आहे . त्यामुळे विद्यार्थांना शाळेत जाणे येणे करणे तसेच नागरीकांना रोडवरून पायी चालणे अवघड झाले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातुन रस्ते दुरुस्तीवर लाखों करोडो रुपये खर्च करत आहे
महाराष्ट्र सरकार ग्रामीण भागातील रोडच्या दुरुस्तीच्या कामावर जिल्हा परिषद (Zilla Parishad) बांधकाम विभागाच्या (Construction Department) माध्यमातुन रस्ते दुरुस्तीवर लाखों करोडो रुपये खर्च करत आहे. परंतु इकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर वरीष्ठ विभागांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने स्थानिक जिल्हा परिषद चे अधिकारी हे ठेकेदारा सोबत हातमिळवणी करून कामे निकृष्ट दर्जाचे करून मोकळे होतात. त्यामुळे रोडचे केलेले दुरूस्तीचे काम काही महिन्यातच उखडून जावून रस्त्याची दुरवस्था होवून जात आहे असाच प्रकार चिखली तालुक्यातील मेरा बु ते गुंजाळा रोडच्या बाबतीत उघडकिस आला आहे. या रस्त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या रस्त्याची गेल्या पन्नास वर्षात दुरुस्तीच झाली नाही. मात्र या दोन गावातील अंतर अवघे तीन कि.मी. चे असून लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नागरिकांना दळण -वळणासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने या खडतर रस्त्याचा सामना शेतकरी, विद्यार्थांना करावा लागत आहे.
या खराब रस्त्यामुळे वाहने नादुरूस्त होत असल्याने वाहन चालकांना वाहनाच्या दुरुस्तीचा फार मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे हा प्रकार आता नेहमीचाच झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी बदलत आहेत परंतु या रस्त्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याकडे लक्ष देवून या रस्त्याचे लवकरात लवकर खडीकरण करुण डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .