उमरा पाटीजवळ घडली घटना
कळमनुरी/हिंगोली (Kalamanuri Accident) : आपल्या मित्रास सोडून हिंगोली कडून कळमनुरी कडे येणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक (Kalamanuri Accident) दिल्याने २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सदरचे अज्ञात वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून, (Kalamanuri Police) पोलीस फरार झालेला वाहनाचा शोध घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कळमनुरी शहरातील मारवाडी गल्ली भागात राहणारा पृथ्वीराज शामसुंदर पाठक हा २१ वर्षीय युवक आपल्या मित्राला सोडण्यासाठी हिंगोली कडे गेला होता आपल्या मित्राला सोडून तो परत कळमनुरी कडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग १६१ वर असलेल्या उमरा पाटी जवळ पृथ्वीराजच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत वाहन त्याच्या अंगावरून घेऊन जाऊन वाहन चालक फरार झाला, या (Kalamanuri Accident) घटनेत पृथ्वीराज पाठकचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना २४ ऑगस्टच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अज्ञात वाहन चालक हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे सदरील घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचून मयत पृथ्वीराजचा मृतदेह कळमनुरी येथील (Kalamanuri Hospital) उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला यानंतर २५ ऑगस्ट रोजी पृथ्वीराजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर कळमनुरी येथील स्मशान भूमीत पृथ्वीराजच्या मृतदेहावर दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान फरार झालेल्या वाहनाचा शोध (Kalamanuri Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.