कळमनुरी/हिंगोली (Kalamanuri bus Accident) : कळमनुरी बस आगाराची बस हे चाफनाथ कडे जात असताना शहरातील मोठा मारुतीचे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला साईट देताना खड्ड्यात गेली. यामुळे पलटी होता ना वाचली यामुळे मोठा अनर्थ टळला.
कळमनुरी बस आगाराची बस (Kalamanuri bus Accident) क्रमांक एम एच 07सी7458 हे बस 2 ऑक्टोबर चे सकाळी सात वाजे ते सुमारास पाच सहा प्रवाश्यना घेऊन चफनाथ कडे जात असताना कळमनुरी सालेगाव रस्त्यावरील कळमनुरी शहरातील मोठा मारुती मंदिर परिसराचे काही अंतरावर समोरून येणारे वाहनाला साईट देताना रस्त्याचे बाजूला असलेले खड्ड्यात पुढचा चाक गेल्याने पलटी होताना वाहन चालकाचे सतर्कतेमुळे वाढली. यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमध्ये असलेले प्रवासी तात्काळ गाडी बाहेर निघाली. (Kalamanuri bus Accident) कळमनुरी ते सालेगाव, सांडस, चाफनाथ, आधी गावांना जाणाऱ्या रस्त्याची देणे अवस्था झाली आहे. तसेच साईट रस्त्यावरही मोठे खड्डे झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहने चालावे लागत आहे. तरी प्रशासन आणि तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे डागडूजी करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.