कळमनुरी/हिंगोली (Kalamanuri Crime) : आषाढी एकादशी व मोहरम निमित्त कळमनुरी पोलिसांचे (Kalamanuri Police) पथक बंदोबस्त करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीआधारे धानोरा जहॉगीरकडे जाणार्या रस्त्यावरील उड्डाण पुलावर पोलिसांनी आयशर वाहन पकडून त्यातील २१ लाख ६० हजार रूपयाचा प्रतिबंधीत केसरयुक्त वजीर गुटखा व ७ लाख रूपयाचा ट्रक असा एकूण २८ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करून (Kalamanuri Crime) तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
१७ जुलैला कळमनुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, (Kalamanuri Police) पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सतिष ठेंगे, दिलीप पोले, किशोर खिल्लारे, शेकुराव बेले, शिवाजी देमगुंडे हे बंदोबस्तासाठी असताना त्यांना नांदेडकडून हिंगोलीकडे आयशर ट्रकमधून अवैध गुटखा जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून धानोरा जहॉगीर रस्त्यावरील उड्डाण पुलावर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रकला थांबविले. (Kalamanuri Crime) ट्रकमध्ये मालाची माहिती चालकाकडे घेतली असता वजीर गुटखा असल्याचे त्यांनी सांगितले.
हा गुटखा कर्नाटक राज्यातील बिदर येथील पुरवठादाराचा असल्याचे सांगून आनंद अग्रवाल यांना पोहचती केला जात असल्याचे सांगितले. या ट्रकसह गुटखा पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ज्यामध्ये २१ लाख ६० हजार रूपयाचा केसरयुक्त वजीर गुटख्याचे ४५ पोते व ७ लाख रूपयाचा आयशर मालवाहू ट्रक असा एकूण २८ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त (Kalamanuri Crime) करण्यात आला. याप्रकरणी कळमनुरी पोलिसात पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक इमरान खान आसीफ खान रा.फस्टक्रॉस गंगो डहाली (बेंगलोर), गुटखा व्यापारी आनंद अग्रवाल हिंगोली, ट्रक मालक सय्यद शोएब शहाबुद्दीन, डिलर अकबर भाई यांच्यावर अन्नसुरक्षा मानके अधिनियमनांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पुढील तपास (Kalamanuri Police) पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सपोनि ज्ञानेश्वर बसवंते, पोउपनि संतोष इंगळे, पोउपनि सतिष ठेंगे, सोपान सांगळे, दिलीप पोले, दादासाहेब कांबळे, शिवाजी देमगुंडे, किशोर खिल्लारे, कैलास सावंत, शशीकांत भिसे, प्रशांत शिंदे, शेकुराव बेले यांनी पार पाडली.